Accident : सीएसएमटी येथे अपघात, चार फुटबॉल खेळाडू जखमी 

या अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून एकाला किरकोळ दुखापत झाली आहे

74
Accident : सीएसएमटी येथे अपघात, चार फुटबॉल खेळाडू जखमी 
Accident : सीएसएमटी येथे अपघात, चार फुटबॉल खेळाडू जखमी 
मुंबईतील सीएसएमटी जंक्शनजवळ मॅकडोनाल्डसमोर एका 80 वर्षीय व्यक्तीने टाटा टियागो कारने चार मुलांना धडक दिली. या अपघातात (Accident) तिघे गंभीर जखमी झाले असून एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. ही चार मुले फुटबॉल खेळण्यासाठी आली होती.
आझाद मैदान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप चटवानी हे माहीमचे रहिवासी असून ते टाटा टियागो कारमधून जीपीओकडून येत होते आणि सिग्नलवरून उजवीकडे वळण घेत असताना त्यांची कार एका खासगी बसला थोडीशी धडकली. यानंतर चटवानी यांनी तेथून पटकन बाहेर पडण्यासाठी कारचा वेग वाढवला मात्र त्यांना गाडीवर ताबा ठेवता आला नाही. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मॅकडोनाल्डसमोर पोलिस व्हॅन उभी होती आणि त्याचवेळी चार मुले तेथून चालत होती. चटवानी यांच्या कारने चार मुलांना धडक दिली आणि पोलिस व्हॅनला धडक दिली. या धडकेत सद्दाम अन्सारी (18), प्रवीण गुप्ता (18) आणि अजय गुप्ता (18) हे गंभीर जखमी झाले. विजय राजभर (17) किरकोळ जखमी झाले.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सद्दाम अन्सारी आणि प्रवीण गुप्ता हे दोघेही आयसीयूमध्ये आहेत तर अजय गुप्ता यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. हे सर्व शिवडी परिसरातील रहिवासी आहेत. डीसीपी प्रवीण मुंढे यांनी सांगितले की, ही घटना संध्याकाळी 7.30 च्या सुमारास घडली. दिलीप चटवानी यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.
पोलिसांनी सांगितले की, चटवानी जी टियागो कार चालवत होते ती ऑटोमॅटिक होती आणि कारला अपघात (Accident) झाला तेव्हा कारमधील एअर बॅग उघडली त्यामुळे चटवानी यांना कोणतीही दुखापत झाली नाही. चारही मुले फुटबॉलपटू आहेत आणि गिफा स्पोर्ट्स क्लबकडून फुटबॉल खेळतात. हे लोक कुलाब्याच्या वायएमसीए मैदानावर सरावासाठी आले होते.(हेही वाचा-Delhi Liquor Scam : दिल्लीतील आप खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीचा छापा)

क्लबचे प्रशिक्षक हरीश गोलार यांनी सांगितले की, पुढील महिन्यात चौघांना फुटबॉलचा सामना खेळण्यासाठी बेळगावला जायचे होते. प्रवीण गुप्ता हा वडाळा येथील बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण घेत आहे. प्रवीणचे वडील शिवजनम गुप्ता (४५) यांनी फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, चार मुले फुटबॉल खेळण्यासाठी आली होती. प्रवीण आणि अजय हे बारावीत आहेत, उर्वरित दोघे शाळेत शिकत आहेत.

आझाद मैदान पोलीस या प्रकरणी आयपीसी कलम 279,338 आणि मोटार वाहन कायद्यानुसार एफआयआर नोंदवत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी चटवानी हा माहीम येथील रहिवासी असून त्याचा मेटल ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. चटवाणी यांचे मशीद बंदर येथे दुकान असून ते घरी जात होते. ही चार मुले फुटबॉल खेळून पायी सीएसएमटी स्टेशनवर येत होती आणि तेथून घरी जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढत होती.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=u5nkQ-4QciU

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.