Ghatkopar-Versova Metro : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो वाहतूक विस्कळीत; स्थानकांवर प्रचंड गर्दी

91
Ghatkopar-Versova Metro : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो वाहतूक विस्कळीत; स्थानकांवर प्रचंड गर्दी
Ghatkopar-Versova Metro : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो वाहतूक विस्कळीत; स्थानकांवर प्रचंड गर्दी

मेट्रो १ मार्गिकेवर ऐन गर्दीच्या वेळी मेट्रोमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. (Ghatkopar-Versova Metro) घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोमध्ये बिघाड झाल्याने या स्थानकांवर प्रचंड गर्दी होऊन चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली आहे. बिघाड झाल्यामुळे मेट्रो सेवा विस्कळीत झाली आहे. मेट्रो १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. (Ghatkopar-Versova Metro)

(हेही वाचा – Accident : सीएसटी येथे अपघात, चार फुटबॉल खेळाडू जखमी)

मेट्रोसेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांनी लोकल प्रवासाला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. मेट्रो मार्गिका ज्या मुख्य लोकल स्थानकांना मिळते, त्या स्थानकांवरही मोठी गर्दी झाली आहे. अंधेरी, दहिसर या लोकल स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. सकाळी कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्यामुळे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी मेट्रोसेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (Ghatkopar-Versova Metro)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.