Pune : पुण्यातील तरुणीची फसवणूक; मुंबईच्या फौजदारासह चार जणांवर गुन्हा दाखल

तरुणीचा मुंबईतील एका मित्राचा सहभाग असून त्याला अटक करण्यात आली आहे

228
Pune : पुण्यातील तरुणीची फसवणूक; मुंबईच्या फौजदारासह चार जणांवर गुन्हा दाखल
Pune : पुण्यातील तरुणीची फसवणूक; मुंबईच्या फौजदारासह चार जणांवर गुन्हा दाखल

पुण्यात राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणीची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह चार जणांविरुद्ध आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात या पीडित तरुणीचा मुंबईतील एका मित्राचा सहभाग असून त्याला अटक करण्यात आली आहे. रवींद्र गायकवाड असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. रवींद्र गायकवाड हे आरसीएफ पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. पुण्यातील कात्रज येथे राहणाऱ्या  तरुणीने मित्राच्या सांगण्यावरून गुंतवणूक करण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन गुरुवारी पुण्याहून स्वतःच्या मोटारीने मुंबईत आली होती. पी डिमेलो रोड येथे मित्र मोसीन याला भेटून तरुणीने मोटारीतच त्याला पैशांची पिशवी सुपूर्द केली.

त्यानंतर हे दोघे मोटारीतून फ्री वे वरून चेंबूरच्या दिशेने आले. मोसीन याने एका ठिकाणी मोटार थांबविण्यास सांगितली. पीडित तरुणीने मोटार बाजूला उभी केली, काही कळायच्या आत एक व्यक्ती मोसीनच्या दिशेने एक पाकीट फेकून गेला आणि त्याच वेळी एक व्यक्ती साध्या वेशात येऊन त्याने स्वतःची ओळख पोलीस असल्याचे सांगून मोसीनला दहा लाख रुपयांच्या रोकडसह ताब्यात घेतले. तरुणीने विचारले असता आरोपी फरार असून आम्ही त्याला शोधत होतो असे सांगून या तरुणीला जायला सांगितले अन्यथा तुम्हाला चौकशीसाठी ताब्यात घेऊ अशी धमकी दिली.

(हेही वाचा – Anger : रागावर नियंत्रण ठेवण्याचा सोपा उपाय जाणून घ्या…)

पीडित तरुणीने मोसीनला ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याच्या रिक्षाचा पाठलाग करीत आरसीएफ पोलिस ठाणे गाठले. मात्र, आरसीएफ पोलीस ठाण्यात मोसीन नावाच्या कुठल्याही व्यक्तीला आणले नसल्याचे तेथील पोलिसांनी सांगितले. तरुणी पोलीस ठाण्यातून बाहेर जाण्यासाठी निघताच तीला मोसीनला घेऊन जाणारा अधिकारी दिसला. तीने त्याच्याकडे चौकशी केली, परंतु त्याने धमकी दिल्यामुळे तरुणी बाहेर पडली व १० लाख रुपये गेल्यामुळे ती रडू लागली.

अखेर एका सद्गृहस्थाने तीला धीर देत पोलीस ठाण्यात आणून तक्रार देण्यास सांगितले. आरसीएफ पोलिसांनी प्रथम मोसीन याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मोसीन याने आरसीएफ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्यासोबत दहा लाख रुपये लुटण्याचा कट रचला होता. या कटात आणि दोन जणांचा सहभाग असल्याचे समोर आले. आरसीएफ पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गायकवाडसह तरुणीचा मित्र मोसीन आणि इतर दोघे अशा एकूण चार जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, मोसीन याला अटक करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.