Drugs : ड्रग्स आणि शस्त्रांसह डोंगरीतून अटक केलेला शहानूर हा ड्रग्स माफिया चिंकू पठाणचा नातलग

शहानूर याच्या घरातून अमली पदार्थासह मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रे आणि २६ मोबाईल फोन जप्त

98
Drugs : ड्रग्स आणि शस्त्रासह डोंगरीतून अटक केलेला शहानूर चिंकू पठाणचा नातलग
Drugs : ड्रग्स आणि शस्त्रासह डोंगरीतून अटक केलेला शहानूर चिंकू पठाणचा नातलग

ड्रग्सतस्करी प्रकरणी डोंगरीतून अटक करण्यात आलेला शहानूर पटेल हा कुख्यात ड्रग्स माफिया आणि अंडरवर्ल्ड माफिया करीम लालाचा नातू चिंकू पठाण यांचा नातलग निघाला आहे. शहानूर याच्या घरातून डोंगरी पोलिसांनी अमली पदार्थासह मोठ्या प्रमाणात घातक शस्त्रे आणि २६ मोबाईल फोन जप्त केले होते. शहानूर ज्या डोंगरी परिसरात रहाणारा आहे, त्याच परिसरातून ८० च्या दशकात दाऊद, करिम लालासारखे तस्कर पुढे मोठे माफिया झाले होते. मागील काही वर्षांपासून डोंगरी हा परिसर अमली पदार्थाचा हब म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने जानेवारी २०२१ मध्ये रायगड जिल्ह्यातून चिंकू पठाण याला अमली पदार्थसह अटक करण्यात आली होती. चिंकू पठाण हा तस्कर करीम लाला याचा नातू आहे. चिंकूच्या अटकेनंतर डोंगरीतील ड्रग्स कारखान्याची माहिती समोर आल्यानंतर एनसीबीने डोंगरी परिसरात २ वेळा छापा टाकला. या छापेमारीत एनसीबीने डोंगरीत ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त करून दाऊद टोळीशी संबंधित आरिफ भुजवाला याला अटक केली होती. आरिफ भुजवाला याने डोंगरीत ड्रग्सचा कारखाना आणि प्रयोगशाळा उभारली होती, आरिफ हा मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ तयार करून त्याची देशात आणि देशाच्या बाहेर तस्करी करीत होता.

(हेही वाचा – Anandacha Shidha : यंदाच्या वर्षीही ‘इतक्या’ रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा)

डोंगरी पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत अटक करण्यात आलेला शहानूर पटेल हा चिंकू पठाण याचा नातलग पठाण याच्या पत्नीचा शहानूर हा चुलत भाऊ असल्याचे समजते. शहानूरकडे केवळ अमली पदार्थ सापडले नसून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि मोबाईल फोन मिळून आले आहे. पोलीस शहानूरकडे कसून चौकशी करत असून ड्रग्सचा व्यवसाय कुणाच्या इशाऱ्यावरून करीत होता याचा तपास सुरू आहे.

डी-कंपनी देखील ड्रग्स तस्करीत…

दक्षिण मुंबईतील डोंगरी हा परिसर अंडरवर्ल्डच्या कारवायामुळे संपूर्ण जगाला माहिती झाला आहे. या डोंगरीमधून कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम जन्माला आला आणि त्याने संपूर्ण मुंबईत आपली दहशत निर्माण केली. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमचे नाव साखळी बॉम्बस्फोटानंतर जगातील गुन्हेगाराच्या यादीत समावेश झाले. पाकिस्तानच्या कराचीत बसून भारतात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या दाऊद इब्राहिम याने पाकिस्तान आयएसआयसोबत हात मिळवणी करून देशाविरोधात कारवाया करणाऱ्या दाऊद इब्राहिम याने खंडणी उकळण्यासोबत अमली पदार्थाच्या तस्करीत प्रवेश केला. सूत्राच्या म्हणण्यानुसार दाऊदच्या इशाऱ्यावर भारतात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ तस्करीचे जाळे विणले गेले आणि अमली पदार्थ तस्करीतून येणारा पैसातून काही हिस्सा दाऊद दहशतवादी कारवायासाठी टेरर फंडिंग म्हणून दहशतवादी संघटनांना पुरवू लागला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.