Ajit Pawar :अजित पवार गट राज्यभरात ताकद वाढवणार

महाविकास आघाडीशी दोन हात करण्यासाठी त्यांनी राज्यभरात आपली ताकद वाढवण्याची रणनीती

79
Ajit Pawar :अजित पवार गट राज्यभरात ताकद वाढवणार
Ajit Pawar :अजित पवार गट राज्यभरात ताकद वाढवणार

 शरद पवार यांनी पाठिंबा देण्यास नकार दिल्यानंतर अजित पवार Ajit Pawar गटाने ‘मोठ्या साहेबां’शिवाय राजकीय आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पवारांसह महाविकास आघाडीशी दोन हात करण्यासाठी त्यांनी राज्यभरात आपली ताकद वाढवण्याची रणनीती आखली आहे. त्यासाठी सर्व ९ मंत्र्यांना जिल्हे वाटून दिले आहेत.

अजित पवार गटाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ मंत्री आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर राज्यातील ३६ जिल्हयांची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सोपवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुणे, सातारा, सांगली व सोलापूर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्यावर भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, व नागपूर, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगरची जबाबदारी देण्यात आली आहे.

(हेही वाचा :Cabinet Meeting : पोषण अभियान कार्यक्रमात राज्याचे योगदान वाढणार)

दिलीप वळसे पाटील यांच्यावर अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा, हसन मुश्रीफ यांच्यावर कोल्हापूर, सिंधुदूर्ग, व अहमदनगर, धनंजय मुंडे यांच्यावर बीड, परभणी, नांदेड, व जालना, संजय बनसोडे यांच्यावर हिंगोली,लातूर, व उस्मानाबाद, अदिती तटकरे यांच्यावर रायगड, रत्नागिरी, ठाणे, व पालघर, अनिल पाटील यांच्यावर जळगाव, धुळे, व नंदुरबार, धर्मारावबाबा आत्राम यांच्यावर गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्हयांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे नेते त्यांना दिलेल्या जिल्ह्यांत जाऊन पक्षविस्तार करतील, असेही सांगण्यात आले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.