चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण : ११ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन

96

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी ११ पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये ८ पोलीस कर्मचारी आणि तीन पोलीस अधिकाऱ्यांचा कमावेश आहे. बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी शाईफेक केली होती. यानंतर मनोज गरबडेसह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटकही केली होती. मात्र आता या घटनेनंतर ११ पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.

( हेही वाचा : नागपूर-बिलासपूर ‘वंदेभारत एक्सप्रेस’ला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा)

कडेकोट बंदोबस्त असताना हा प्रकार घडला कसा यावरून प्रश्नचिन्हं उपस्थित होतं आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यात एकच खळबल उडाली होती. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणात आता एका पत्रकाराला सुद्धा अटक करण्यात आली आहे. चंद्रकांता पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या दोन व्यक्तींसोबत हा पत्रकार सहभागी झाला होता यानंतर ठरवून शाईफेकीचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

विनंतीनंतरही निलंबनाची कारवाई

दरम्यान शाईफेक झाल्यानंतर महाराष्ट्रात झुंडशाही सुरू असून हिंमत असेल तर समोर या असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांना दिले आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांना दोष देण्याचे कारणनाही. त्यामुळे निलंबनाची कारवाई करू नका अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी केली होती. परंतु तरीही आता ११ पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.