Drugs Case : कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणात कुर्ल्याची लेडी ड्रग्ज माफिया परवीनबानो सह १० जणांना अटक

परवीनबानो हिच्याकडून गुन्हे शाखेने ६४० ग्रॅम मफेड्रोन (MD) आणि अमली पदार्थ विक्रीतून आलेली १२ लाख रुपयांची रोकड आणि दीड लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले होते.

268
Drugs Case : कोट्यवधींच्या ड्रग्ज प्रकरणात कुर्ल्याची लेडी ड्रग्ज माफिया परवीनबानो सह १० जणांना अटक

मुंबई गुन्हे शाखेने सांगली येथील एमडीच्या (MD) कारखान्यात छापा टाकून जप्त केलेल्या २५२ कोटीच्या मेफेड्रोन (MD) या अमली पदार्थाच्या बेकायदेशीर धंद्यात कुर्ल्यातील परवीनबानो शेखसह एकूण दहा जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखा कक्ष ७च्या पथकाने फेब्रुवारी महिन्यात कुर्ला पश्चिम सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड येथून सर्वात प्रथम परवीनबानो (३३) ६४० ग्रॅम एमडीसह अटक केल्यानंतर सांगलीतील एमडीच्या फॅक्टरीचा सुगावा गुन्हे शाखेला लागला. या सुगाव्यावरून गुन्हे शाखेने सांगलीत जाऊन एमडीचा कारखाना उध्वस्त करण्यात गुन्हे शाखेला यश आले. (Drugs Case)

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुर्ला पश्चिम येथील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड येथून फेब्रुवारी महिन्यात मुंबई गुन्हे शाखा कक्ष ७च्या पथकाने परवीनबानो शेख (३३) या लेडी ड्रग्ज पेडलर्सला अटक केली होती. परवीनबानो हिच्याकडून गुन्हे शाखेने ६४० ग्रॅम मफेड्रोन (MD) आणि अमली पदार्थ विक्रीतून आलेली १२ लाख रुपयांची रोकड आणि दीड लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले होते. परवीनबानो ही मागील काही वर्षांपासून कुर्ल्यातील अमली पदार्थ (Drugs Case) विक्रेत्यांना एमडीचा पुरवठा करीत होती. परवीनबानो ही प्रथमच पोलिसांच्या जाळ्यात अडकली होती, तिच्या चौकशीत ती मीरा रोड येथून एमडी ड्रग्ज विकत आणून कुर्ल्यातील लहान मोठ्या ड्रग्ज (Drugs Case) विक्रेत्यांना ड्रग्जचा सप्लाय करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. (Drugs Case)

(हेही वाचा – BMC : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने मोठ्या थकबाकीदारांना केले टार्गेट)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एमडीची किंमत आहे इतकी 

गुन्हे शाखा कक्ष ७चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, महिला पोलीस निरीक्षक बाळगी, उबाळे, शिंदे या पथकाने मीरा रोड येथून साजीद मोहम्मद आसिफ शेख उर्फ डेबस (२५) याला ३ किलो एमडीसह अटक करण्यात आली. साजिदच्या चौकशीत त्याने हा एमडी गुजरात राज्यातील सुरत येथून आणल्याची कबुली दिली. गुन्हे कक्ष ७च्या पथकाने गुन्हे शाखेच्या इतर पथकाची मदत घेऊन सुरत येथे कारवाई करून इजाजअली इमदाद अली अन्सारी (२४) आणि आदिल इम्तीयाज बोहरा (२२) यादोघाना अटक केली. सुरत येथून अटक करण्यात आलेल्या दोघांच्या चौकशीत हे दोघे एमडी हा अमली पदार्थ (Drugs Case) सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकाळ येथील इरळी या गावातील एका कारखान्यातून घेऊन येत होते अशी माहिती समोर आली. (Drugs Case)

गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने २५ मार्च रोजी सांगली येथील एमडी तयार करण्याचा कारखान्यावर छापा टाकून जवळपास १२३ किलो एमडी जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कवठेमहांकाळ येथून प्रविण उर्फ नागेश रामचंद्र शिंदे (३४), वासुदेव लक्ष्मण जाधव (२५), प्रसाद बाळासो मोहिते (२४), विकास महादेव मलमे (२५), अविनाश महादेव माळी (२८), लक्ष्मण बालु शिंदे (३५) यांना अटक करण्यात आली. या सर्व प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या एमडी या अमली पदार्थाची (Drugs Case) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २५२ कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे, यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष-७चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तावडे, पो.नि. आत्माजी सावंत, म.पो.नि. बाळगी, पो.नि. उबाळे, सहा फौ. धुमाळ, नाईक, सावंत, उबाळे, पो. अंमलदार पवार, गुरव, शिंदे, बडगुजर, मोरे, कांबळे, अजय बल्लाळ, गिरीश जोशी, शेख, शिरापुरी, पांडे, गलांडे जाधव, भोई, म.पो.ह.तिरोडकर, राऊत, शिंदे, सय्यद, विकास होनमाने, सावंत, पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली. (Drugs Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.