BMC : मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने मोठ्या थकबाकीदारांना केले टार्गेट

बृहन्‍मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह २४ विभाग कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रांमध्‍ये कर भरण्याची सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे.

727
Mumbai Digital Board : मुंबईत झळकणार ४०० डिजिटल जाहिरात फलक, महापालिकेच्या तिजोरीत महिन्याला वाढणार अडीच कोटींचा महसूल

मुंबई महापालिकेच्या उत्पनाचा प्रमुख स्त्रोतापैंकी एक असलेल्या मालमत्ता कराची वसुली २७ मार्च २०२४ च्या दुपारपर्यंत २ हजार २१३ कोटी रुपये एवढी झाली आहे. मालमत्ता कराचे या आर्थिक वर्षांत ४५०० कोटी रुपयांचे लक्ष्य आहे. त्यातुलनेत केवळ तीन दिवस शिल्लक राहिलेले असताना केवळ २२१३ कोटी रुपये एवढाच महसूल जमा झाला. फेब्रुवारीपर्यंत केवळ ७०० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता, त्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी मालमत्ता कराची देयके जारी करण्यात आल्यानंतर याची वसुली कमी होणार हे लक्षात येता महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) अश्विनी जोशी यांनी सहआयुक्त सुनील धामणे आणि करनिर्धारण व संकलन विभागाचे सहायक आयुक्त महेश पाटील यांना निर्देश देत मोठ्या थकबाकीदारांना टार्गेट करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार करण्यात येणाऱ्या वसुलीमुळे किमान निम्म्यापेक्षा अधिक कराची वसुली करण्यात यश आले आहे. (BMC)

नागरी विकासात मालमत्ता कराचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्‍यामुळे मालमत्ता कर वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी करनिर्धारण व संकलन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत. आतापर्यंत २ हजार २१३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. सध्या करनिर्धारण व संकलन विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांमधील मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी देखील प्राधान्य देण्यात येत आहे. मुंबईकर नागरिकांनी दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत मालमत्ता कर भरणा करुन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. आर्थिक वर्षातील उर्वरित ४ दिवसांत अधिकाधिक कर वसूल करण्याचे महानगरपालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. (BMC)

काही मालमत्ता धारकांनी अद्यापपर्यंत मालमत्ता कर भरलेला नाही. मालमत्ता कराची देयके विहित पद्धतीने मालमत्ता धारकांकडे पोहचविण्यात आली असून विहित मुदतीत त्यांनी मालमत्ता कर भरणे आवश्यक आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह २४ विभाग कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रांमध्‍ये कर भरण्याची सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध करून दिली आहे. साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी म्‍हणजेच दिनांक २७ ते ३० मार्च दरम्‍यान महानगरपालिका मुख्‍यालयासह सर्व २४ प्रशासकीय विभागांमधील नागरी सुविधा केंद्र सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत. तर आर्थिक वर्षाच्‍या अखेरच्‍या दिवशी अर्थात दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत सुरू रहाणार आहेत. (BMC)

(हेही वाचा – Devendra Fadnavis : नितीन गडकरी यांना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या)

कर वसुली सर्वाधिक केलेले महापालिकेच्या टॉप ५ विभाग
  • के पूर्व विभाग – २०८ कोटी ७६ लाख ३८ हजार रूपये
  • के पश्चिम विभाग – १७४ कोटी १५ लाख २१ हजार रूपये
  • एस विभाग – १७० कोटी ७७ लाख ९१ हजार रूपये
  • एच पूर्व विभाग – १६८ कोटी ३४ लाख ३१ हजार रूपये
  • जी दक्षिण विभाग – १६० कोटी ८३ लाख ४७ हजार रूपये (BMC)
हे आहेत ‘टॉप टेन’ थकबाकीदार
  • एस विभाग : राजेश बिजनेस लिजर्स हॉटेल प्रा. लि. – ४९ कोटी १२ लाख ३३ हजार ५४१ रुपये
  • जी दक्षिण विभाग : कमला मिल्‍स् लिमिटेड जॉईन्‍ट स्‍टॉक कंपनी – २० कोटी ८४ लाख १९ हजार ६३१ रुपये
  • एच पश्चिम विभाग : सिंधुकुमार वाय मेहता – ९ कोटी ५८ लाख ९५ हजार ९०८ रुपये
  • एच पश्चिम विभाग : गॅलेक्‍सी कॉर्पोरेशन – ८ कोटी ८५ लाख ९२ हजार ३८७ रुपये
  • के पश्चिम विभाग : मोहीत कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनी – ८ कोटी ७९ लाख २५ हजार ९८० रुपये
  • जी दक्षिण विभाग : गौरव इन्‍वेस्‍टमेंट – ८ कोटी ५८ लाख ७३ हजार ५३६ रुपये
  • जी दक्षिण विभाग : न्‍यू सन मिल्‍स् कंपनी लिमिटेड – ८ कोटी २३ लाख १३ हजार ६५९ रूपये
  • डी विभाग : ए. आर. जाफर – ६ कोटी ३३ लाख २६ हजार ४२६ रुपये
  • जी दक्षिण विभाग : अंबिका सिल्‍क मिल्‍स् कंपनी लिमिटेड – ५ कोटी ६३ लाख ७ हजार ८९ रुपये
  • डी विभाग : स्‍टर्लिंग इन्‍वेस्‍टमेंट – ४ कोटी ५७ लाख ७९ हजार ८७६ रुपये (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.