Asian Games 2026 आशियाई खेळ २०२६ मधील १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक अंतिम फेरीत भारताच्या एलावेनिल वलारिवन आणि पार्थ माने यांना चौथे स्थान मिळाले. ३७६.३ गुणांसह बाहेर पडल्यामुळे त्यांना पदकापासून वंचित राहावे लागले. पहिल्या फेरीनंतर (सिरीज) भारतीय जोडी चौथ्या स्थानावर होती. त्यांनी पहिल्या १० शॉट्समध्ये १०३.६ गुण मिळवले होते. १०७.२ गुणांसह चीन आघाडीवर होता, तर त्यापाठोपाठ दक्षिण कोरिया (१०४.९) आणि जपान (१०३.९) होते. (Asian Games 2026)
(हेही वाचा – Today Horoscope 22 September 2026 : श्रीगणेशाच्या कृपेने आजचा दिवस कसा जाणार? तुमच्या राशीसाठी काय संकेत?)
२० शॉट्सनंतर, एलावेनिल आणि पार्थ २०७.९ गुणांसह चौथ्या स्थानावर कायम होते आणि तिसऱ्या स्थानावरील दक्षिण कोरियापेक्षा १.३ गुणांनी मागे होते. चीन २११.९ गुणांसह आघाडीवरच होता. तिसऱ्या फेरीनंतरही भारताची स्थिती कायम राहिली; ही जोडी ३१२.३ गुणांसह चौथ्या स्थानावर होती. चीन ३१५.७ गुणांसह आघाडीवर होता, तर त्यापाठोपाठ जपान (३१४.९) आणि दक्षिण कोरिया (३१४.३) होते. अखेरीस, ३७६.३ गुणांसह चौथे स्थान मिळाल्यामुळे एलावेनिल आणि पार्थ स्पर्धेतून बाहेर पडले. (Asian Games 2026)
(हेही वाचा – Barapullah Phase-III Corridor चे 29 सप्टेंबरला उद्घाटन; पूर्व दिल्ली ते AIIMS प्रवास होणार अधिक सुलभ)
तत्पूर्वी, पात्रता फेरीत भारतीय जोडीने ६३४.९ गुण मिळवून दुसरे स्थान पटकावले होते आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. चीनने ६३८.९ गुणांच्या जागतिक विक्रम नोंदवत पात्रता फेरीत अव्वल स्थान मिळवले होते. (Asian Games 2026)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

