BMC: १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाई, मुंबई महापालिकेची १ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम

20
BMC: १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाई, मुंबई महापालिकेची १ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम
BMC: १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाई, मुंबई महापालिकेची १ ऑक्टोबरपासून विशेष मोहीम

BMC: येत्या १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत मुंबई महापालिका प्रशासनाकडून झोपडपट्टी परिसरातील अनधिकृत बांधकामांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येईल. मात्र त्याआधी झोपडपट्टी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे तिथे वास्तव्यास असलेल्या संबंधित रहिवाशांनी स्वत:हून तात्काळ तोडावीत अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये एकूण २ लाख २३ हजार १५० झोपड्या आहेत. त्यापैकी ३९ हजार १११ झोपड्या १४ फूट आणि त्यापेक्षा अधिक उंचीच्या असल्याचे निर्दशनास आले आहे. यापैकी ३ हजार ३४८ झोपड्या शहर विभाग, ४ हजार ५३६ झोपड्या पश्चिम उपनगरे आणि ३१ हजार २२७ झोपड्या पूर्व उपनगरांत आहेत.

हेही वाचा  – Iran War Impact on Global Economy : इराण युद्ध थांबलं तरीही परिणाम जगावर दीर्घकाळ राहील

दरम्यान, ४ हजार ५८४ झोपड्यांवर यापूर्वी निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. ६११ झोपड्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित झोपड्यांत वास्तव्यास असलेल्या रहिवाश्यांनी संबंधित बांधकामे स्वतःहून तात्काळ निष्कासित करावीत अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

१४० बांधकामे कारवाईच्या रडारवर
मुंबईत अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेच्या विविध प्रशासकीय विभागांकडून (वॉर्ड) सातत्याने कारवाई सुरू आहे. २४ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत एकूण १२८ अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तर, १४० अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई नियोजित आहे. नागरिकांनी अनधिकृत बांधकामे करू नयेत तसेच अशाप्रकारचे बांधकाम केले असल्यास ते स्वतšहून तात्काळ हटवावेत. अन्यथा, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.