IBPSमार्फत बँका आणि पोस्टात ३७,४६३ पदांची भरती, केवळ दोन दिवस शिल्लक; ऑनलाइन अर्ज कसा कराल?

17
IBPSमार्फत बँका आणि पोस्टात ३७,४६३ पदांची भरती, केवळ दोन दिवस शिल्लक; ऑनलाइन अर्ज कसा कराल?
IBPSमार्फत बँका आणि पोस्टात ३७,४६३ पदांची भरती, केवळ दोन दिवस शिल्लक; ऑनलाइन अर्ज कसा कराल?

IBPS आयबीपीएस मार्फत बँकेत भरल्या जाणाऱया १३ हजार ७०६ पदांच्या जागा आणि भारतीय डाक विभागात जीडीएस पदांच्या एकूण २३ हजार ७५७ अशा एकूण ३७ हजार ४६३ पदांच्या जागांसाठी अर्ज करायला आता केवळ दोन दिवस उरले आहेत. या सर्व पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अखेरची तारीख २१ सप्टेंबर २०२६ आहे.

आयबीपीएस मार्फत भरल्या जाणाऱया एकूण १३ हजार ७०६ पदांसाठी पूर्वपरीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर २०२६ तर मुख्य परीक्षा डिसेंबर किंवा फेब्रुवारी २०२७ रोजी होईल. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट https://ibpsreg.ibps.in वर देण्यात आली आहे. देशभरातील विविध पोस्ट खात्यांमध्ये तब्बल २३ हजार ७५७ पदांची भरती करण्यात येणार आहे. ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक अशा तीन विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर निकष पूर्ण करणाऱया उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिता www.indiapost.gov.in या पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

हेही वाचा – Ganeshotsav 2026 : अंजीर-मखाण्यापासून साकारली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; अमरावतीत विशेष आकर्षण

आयबीपीएसमधील जागा
ऑफिस असिस्टंट
(मल्टीपर्पज)         ८,१८३
ऑफिसर स्केल-          १
(असिस्टंट मॅनेजर) ४,२५६
ऑफिसर स्केल-॥
(जनरल बँकिंग ऑफिसर)
(मॅनेजर)            ६६६
ऑफिसर            स्केल-२
(आयटी)                १८२
ऑफिसर               स्केल-२
(सीए)                  ८१
ऑफिसर स्केल-२
(लॉ) ४

ऑफिसर स्केल-२
(ट्रेझरी मॅनेजर) १८
ऑफिसर स्केल-२
(मार्केटिंग ऑफिसर) १६
ऑफिसर स्केल-२
(अॅग्रीकल्चर मॅनेजर) ३८
ऑफिसर स्केल-३ २२०

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.