Kashedi Tunnel : कशेडी बोगद्यातील दिवे बंद; ५०० मीटर परिसरातील अंधाराने वाढवली चिंता, ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास अंधारात…

13
Kashedi Tunnel : कशेडी बोगद्यातील दिवे बंद; ५०० मीटर परिसरातील अंधाराने वाढवली चिंता, ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास अंधारात...
Kashedi Tunnel : कशेडी बोगद्यातील दिवे बंद; ५०० मीटर परिसरातील अंधाराने वाढवली चिंता, ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास अंधारात...
Kashedi Tunnel : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या प्रकाश व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले (Kashedi Tunnel on Mumbai-Goa Highway) आहे. बुधवार, ता. १६ सप्टेंबर रोजी रात्री १०.४३ वाजता टिपलेल्या व्हिडिओमध्ये बोगद्याचा तब्बल ५० टक्के भाग अंधारात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. विशेषतः चिपळूण दिशेच्या प्रवेशद्वाराकडील मोठ्या भागातील दिवे बंद असल्याचे निदर्शनास आले.

बोगद्याच्या आतच नव्हे, तर चिपळूण दिशेच्या प्रवेशमार्गावरील सुमारे ५०० मीटर परिसरातील पथदिवेही बंद आहेत. त्यामुळे बोगद्यात प्रवेश करणाऱ्या तसेच बाहेर पडणाऱ्या वाहनचालकांना अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ सुरू असताना कशेडी बोगद्याच्या प्रकाशव्यवस्थेची ही स्थिती चिंताजनक आहे.

हेही वाचा  – Iran War Impact on Global Economy : इराण युद्ध थांबलं तरीही परिणाम जगावर दीर्घकाळ राहील

बोगद्यासारख्या संवेदनशील ठिकाणी पुरेशी आणि कार्यरत प्रकाशव्यवस्था असणे वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात दिवे बंद असल्याने संबंधित यंत्रणेच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन आता तरी जागे होणार का? एखादी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी प्रकाशव्यवस्था तातडीने सुरळीत करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

कशेडी बोगद्यात पाण्याची गळती सुरूच
कशेडी बोगद्यातील अडचणी या नित्याच्या झालेल्या आहेत. परंतु ऐन गणेशोत्सव काळातदेखील कशेडी बोगद्यात पाण्याची गळती सुरूच असून अचानकपणे दिवे जात असल्याने अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या संदर्भात संबंधित विभागाने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, असे भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद चाळके यांनी सांगितले.

प्रवाशाची प्रतिक्रिया…
अंधार आणि बोगद्यात होणारी पाणी गळती यामुळे अपघात झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रीय बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी प्रतिक्रिया प्रवासी श्रीकांत कामेरकर यांनी व्यक्त केली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.