Mumbai BMW Accident : कोस्टल रोडवर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू! नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाची BMW कार मरीन ड्राईव्हहून हाजी अलीच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला

16
Mumbai BMW Accident

Mumbai BMW Accident : मुंबईच्या कोस्टल रोडवर (Coastal road Mumbai) रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव BMW कारने पादचाऱ्यांना धडक दिल्याने 3 जणांचा मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सकाळी सुमारे 5:20 वाजता, लाला कॉलेजसमोरील लोटस जेटीजवळ घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाची BMW कार मरीन ड्राईव्हहून (Marine Drive) हाजी अली (Haji Ali) च्या दिशेने जात होती. त्याचवेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. प्राथमिक माहितीनुसार, कारचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Mumbai BMW Accident)

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी झालेल्या चौघांना उपचारासाठी तात्काळ मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये (Nair Hospital) दाखल करण्यात आले.

हेही वाचा: Ketan Agarwal Case : केतनला आधी अपंग करण्याचा डाव, फेक अकाउंट, सिनेमासारखं प्लॅनिंग अन्… 5,053 पानांच्या आरोपपत्राने उलगडलं मोठं रहस्य

3 जणांचा मृत्यू, 1 गंभीर

Nair Hospitalच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात आणलेल्या 4 जणांपैकी 3 जणांना मृत घोषित करण्यात आले. चौथ्या व्यक्तीवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. BMCकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतांपैकी दोन जणांची ओळख पटली असून, शनाय गज्जल (21 वर्षे), धैर्या सेठ (17 वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. याशिवाय एका २५ वर्षीय अज्ञात तरुणाचाची मृत्यू झाला आहे. (Mumbai BMW Accident)

तर अपघातात गंभीर जखमी झालेल्या 20 वर्षीय अज्ञात तरुणावर, ट्रॉमा वॉर्डमध्ये अतिदक्षता उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

BMW चालक ताब्यात

प्रत्यक्षदर्शींनी काळ्या रंगाची BMW वेगाने जात असल्याचे सांगितले. त्यानंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनीही अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र अपघाताची नेमकी कारणे तपासानंतर स्पष्ट होतील. (Mumbai BMW Accident)

हेही वाचा: Kalachowki Mahaganpati : मुंबईतील काळाचौकीच्या महागणपतीजवळ विजेच्या धक्क्याने 8 वर्षीय मुलीचा मृत्यू, पाच जण जखमी

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी BMW चालकाला ताब्यात घेतले आहे. अपघात नेमका कसा झाला, कारचा वेग किती होता आणि चालकाच्या निष्काळजीपणाची भूमिका किती होती, याचा तपास सुरू आहे.

पहाटे झालेल्या या ताज्या अपघातामुळे मुंबईच्या कोस्टल रोडवरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील अधिक माहिती तपासानंतर समोर येण्याची शक्यता आहे. (Mumbai BMW Accident)

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.