
-
ऋजुता लुकतुके
Ajit Agarkar Resignation भारतीय क्रिकेट प्रशासनात येत्या दिवसांत मोठा बदल अपेक्षित आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आपल्याला मुदतवाढ नको असल्याचं बीसीसीआयला कळवल्याचं समजतंय. त्यांची विद्यमान मुदत ४ ऑक्टोबरला संपत असून, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या शोधाची प्रक्रियाही सुरू झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. (Ajit Agarkar Resignation)
आगरकर यांनी आपला निर्णय बीसीसीआयच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कळवला असून, यासंदर्भात दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाल्याचेही समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत आगरकर यांना २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत मुदतवाढ मिळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता त्यांनीच पदावर पुढे राहण्यास उत्सुक नसल्याचं कळवलं आहे. (Ajit Agarkar Resignation)
(हेही वाचा – १७ वर्षांची प्रतीक्षा अन ५,५०० कोटींची उधळपट्टी; Mumbai-Goa Highway चे काम अद्याप अपूर्णच!)
आगरकर यांनी जुलै २०२३मध्ये निवड समिती अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने २०२४चा टी-२० विश्वचषक आणि २०२५ची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली. त्याच काळात भारतीय संघात मोठे बदलही झाले. कसोटी क्रिकेटमध्ये शुभमन गिलकडे नेतृत्वाची जबाबदारी आली, तर रोहीत शर्मा आणि विराट कोहली यांच्या कसोटी कारकिर्दीचा टप्पा संपला. (Ajit Agarkar Resignation)
मात्र, आगरकर यांच्या कार्यकाळाच्या अखेरीस निवड समिती आणि बीसीसीआय यांच्यातील काही मतभेदही समोर आले. रोहीत शर्माच्या एकदिवसीय भवितव्याबाबत निवड समितीची भूमिका आणि नंतर बीसीसीआयकडून रोहीतला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवरही चर्चा झाली. आगरकर अलीकडे झालेल्या बीसीसीआयच्या आढावा बैठकीलाही उपस्थित नव्हते. (Ajit Agarkar Resignation)
(हेही वाचा – Gold Rate today India : सोन्याच्या दरात पुन्हा उसळी; खरेदीपूर्वी जाणून घ्या 22, 24 कॅरेटचा ताजा भाव)
दरम्यान, आगरकर यांच्या जागी माजी भारतीय यष्टिरक्षक पार्थिव पटेल आणि माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा यांची नावे चर्चेत आहेत. या जागेसाठी आता पार्थिव पटेल प्रमुख दावेदार असल्याचे बोलले जात आहे, तर प्रज्ञान ओझाही या शर्यतीत असल्याचे समजते. बीसीसीआयच्या घटनेनुसार निवड समितीतील सर्वाधिक कसोटी सामने खेळलेल्या सदस्याला अध्यक्षपद मिळण्याची तरतूद असल्याने दोन्ही नावांची चर्चा महत्त्वाची ठरते. (Ajit Agarkar Resignation)
विशेष म्हणजे, बीसीसीआयच्या ९५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड समितीच्या भवितव्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी आगरकर यांच्या भवित्याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नसल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर आगरकर यांनी पदावर पुढे राहण्यास असमर्थता दर्शवल्याचं समोर आलं. त्यामुळे येत्या काही दिवसांत भारतीय क्रिकेटच्या निवड समितीच्या नेतृत्वाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. (Ajit Agarkar Resignation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
