Crime : मुंबईत पोलीस चौकीतूनच वायरलेस वॉकी-टॉकी चोरीला; व्ही. पी. रोड पोलिसांकडून तपास सुरू

20
Crime : मुंबईत पोलीस चौकीतूनच वायरलेस वॉकी-टॉकी चोरीला; व्ही. पी. रोड पोलिसांकडून तपास सुरू
  • प्रतिनिधी 

Crime          मुंबई पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेला वॉकी-टॉकी थेट पोलीस चौकीतूनच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘दोन टाकी’ पोलीस चौकीत चार्जिंगसाठी लावलेला हा वॉकी-टॉकी अज्ञात व्यक्तीने लांबवला. (Crime)

(हेही वाचा – SSC Board : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य मंडळाचा महत्त्वाचा निर्णय; सर्वात मोठा सस्पेन्स अखेर संपला! वाचा सविस्तर)

प्राथमिक माहितीनुसार, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांचा वॉकी-टॉकी चौकीमध्ये चार्जरला जोडलेला होता. त्याच दरम्यान अज्ञात चोरट्याने संधी साधून तो चोरून नेला. हा प्रकार लक्षात येताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली. (Crime)

(हेही वाचा – Mumbai Crime : मुंबईत ‘ओटीपी फार्मिंग’चा पर्दाफाश! कंबोडियातील सायबर भामट्यांवर पोलिसांची धडक कारवाई)

या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली असून संशयिताचा शोध घेतला जात आहे. या संदर्भात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.