
-
प्रतिनिधी
Marathwada Drought-Free छत्रपती संभाजीनगर येथे पायाभूत सुविधा, आरोग्य आणि औद्योगिक विकासाला गती देणारे अनेक मोठे प्रकल्प वेगाने मार्गी लागत आहेत. शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ७१० कोटी रुपयांची नवी इमारत उभी राहत असून, धाराशिवमध्ये ५०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज, तर परळीत ५६५ कोटींचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येत आहे. तसेच समृद्धी महामार्ग आणि पश्चिम उन्नत द्रुतगती मार्गामुळे शेंद्रा-बिडकीन व ‘डीएमआयसी’ हे देशातील अग्रगण्य ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर बनत असून, टोयोटा, जेएसडब्ल्यू, एथर यांसारख्या कंपन्यांच्या गुंतवणुकीसाठी आणखी ८ हजार एकर जागा अधिग्रहित केली जात आहे. दळणवळण सुलभ करण्यासाठी जालना ड्रायपोर्ट, ३५०० कोटींचे रस्ते आणि शहरातील सर्वांत लांब उन्नत मार्ग साकारला जात आहे. (Marathwada Drought-Free)
(हेही वाचा – UPI MDR, UPI Charges 2026 : युपीआय शुल्काला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, २,००० वरील शुल्क रद्द करण्याची मागणी)
दुसरीकडे, यंदाच्या दुष्काळी स्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या ठामपणे पाठीशी उभे असून ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे पूर्ण करून तातडीने मदत दिली जाणार आहे. आतापर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेतून १५ लाखांहून अधिक शेतकरी कर्जमुक्त झाले असून, मोफत विजेसोबतच तब्बल ४८ हजार कोटी रुपयांची जुनी वीजबिले रद्द करण्यात आली आहेत. शिवाय शहरातील प्रत्येक घरात लवकरच रोज पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. (Marathwada Drought-Free)
(हेही वाचा – Manoj Jarange Hunger Strike End : सात समुद्रापार घडामोडी अन् महाराष्ट्रातील उपोषण संपलं; मध्यरात्री असं काय घडलं?)
हे सर्व महत्त्वाचे निर्णय मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात समोर आले. छत्रपती संभाजीनगरमधील सिद्धार्थ उद्यान येथे आयोजित या दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण, बंदुकीच्या तीन फैरींची मानवंदना आणि शहीद स्मारकास अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी घोषणा केली; ते म्हणाले की, या पिढीने भोगलेला दुष्काळ पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ देणार नाही. यासाठी कृष्णा खोऱ्यातून अतिरिक्त ३० टीएमसी पाणी भीमा खोऱ्यामार्गे धाराशिव, बीड आणि लातूरला आणले जाईल, तसेच उल्हास खोरे व कोकणातील वाहून जाणारे ७० टीएमसी पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे गोदावरी खोऱ्यात आणून पुढील सात वर्षांत मराठवाडा कायमचा दुष्काळमुक्त केला जाईल. (Marathwada Drought-Free)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
