Pune Crime : पुण्यातील हॉटेलमध्ये देहविक्रीचे रॅकेट उघड; पोलिसांनी सापळा रचत केला पर्दाफाश

पोलिसांनी देहविक्रीच्या व्यवसायात अडकवण्यात आलेल्या 2 महिलांची सुटका केली

13
Pune Crime
पुण्यातील हॉटेलमध्ये देहविक्रीचे रॅकेट उघड (प्रातिनिधिक फोटो)

Pune Crime :  पुण्यातील येरवडा परिसरात खासगी हॉटेलच्या माध्यमातून सुरू असलेल्या देहविक्री रॅकेटचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून, त्यांच्या तावडीतून 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली. ऑनलाइन पद्धतीने ग्राहकांशी संपर्क साधून हे रॅकेट चालवले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खासगी हॉटेलमध्ये देहविक्रीचा प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी माहितीची खातरजमा करत कारवाईची तयारी केली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचून पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा टाकला. यावेळी देहविक्रीच्या व्यवसायात अडकवण्यात आलेल्या 2 महिलांची सुटका करण्यात आली. (Pune Crime)

हेही वाचा: Indian Women Cricket Team : आशियाई खेळांसाठी महिला क्रिकेट संघ जपानमध्ये दाखल; अमोल मुझुमदारने दिला प्रतिस्पर्ध्यांना इशारा

ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून गैरप्रकार

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राज राजेशाम सविता आणि सुनील शिवाजी शिंदे अशी आहेत. पोलिसांच्या तपासानुसार, हे दोघे फोन आणि ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधत होते. ग्राहकांकडून पैसे घेतल्यानंतर पीडित महिलांशी त्यांची भेट घडवून आणली जात असल्याचे समोर आले आहे.

महिलांना देहव्यवसाय करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची माहितीही पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. गरजू महिलांना या जाळ्यात ओढून त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप आरोपींवर आहे. यापूर्वीही अनेक महिलांना अशा प्रकारे या व्यवसायात ओढल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. (Pune Crime)

बनावट ग्राहक बनून पोलिसांची कारवाई

गुप्त माहिती मिळाल्यानंतर येरवडा पोलिसांनी आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला आणि त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार खासगी हॉटेलमध्ये छापा टाकला.

हेही वाचा: उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर CM Devendra Fadnavis यांचा थेट जिव्हारी लागणारा वार; मराठवाड्यात नेमकं काय घडलं?

या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्या तावडीत असलेल्या 2 महिलांची सुटका केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे येरवडा परिसरात सुरू असलेला देहविक्रीचा प्रकार उघडकीस आला. (Pune Crime)

दरम्यान, या प्रकरणी राज राजेशाम सविता आणि सुनील शिवाजी शिंदे यांच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच यापूर्वी अशा प्रकारे आणखी किती महिलांना या व्यवसायात ओढण्यात आले होते, याचा पोलीस तपास करत आहेत. प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत. (Pune Crime)

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.