Women’s Asia Cup 2026 : आशिया चषकातील करंडकाच्या वादावर कपिल देव यांची एका वाक्यात प्रतिक्रिया

Women's Asia Cup 2026 : कपिलने आपला मोर्चा सध्या गोल्फकडे वळवला आहे. 

16
Women's Asia Cup 2026 : आशिया चषकातील करंडकाच्या वादावर कपिल देव यांची एका वाक्यात प्रतिक्रिया
  • ऋजुता लुकतुके

Women’s Asia Cup 2026              महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ७२ धावांनी पराभव करत आठव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं. मात्र, विजेतेपदाचा करंडक स्वीकारताना भारतीय महिला संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून तो स्वीकारला नाही. या घटनेवर भारताचे माजी कर्णधार आणि १९८३ विश्वविजेते कपिल देव यांना विचारण्यात आलं असता त्यांनी एका वाक्यात उत्तर दिलं. (Women’s Asia Cup 2026)

रायपूर येथे ‘नवा रायपूर ओपन २०२६’ गोल्फ स्पर्धेच्या उद्घाटनावेळी कपिल देव यांना या प्रकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, “सगळ्यांना गोल्फ खेळायला सांगा,” असं मिश्कील उत्तर दिलं. कपिल देव सध्या व्यावसायिक गोल्फ टूर ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. (Women’s Asia Cup 2026)

(हेही वाचा – IPL 2027 Auction : आता दर ४ वर्षांनी आयपीएलचा लिलाव; पुढच्या हंगामात ‘इम्पॅक्ट खेळाडू’ नियमही जाणार?)

आशिया चषकात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेवर ७२ धावांनी मात केली. त्यामुळे भारतीय महिला संघाने विक्रमी आठव्यांदा महिला आशिया चषक जिंकला. मात्र, पारितोषिक वितरणावेळी मोहसिन नक्वी यांच्याकडून करंडक स्वीकारण्यासाठी भारतीय खेळाडू मंचावर गेले नाहीत. (Women’s Asia Cup 2026)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं की, करंडक स्वीकारायचा की नाही, हा निर्णय मंडळाचा सामूहिक निर्णय होता. या भूमिकेबाबत आशियाई क्रिकेट परिषदेला आधीच माहिती देण्यात आली होती आणि नक्वी यांनी त्यावर कोणताही आक्षेप घेतला नसल्याचंही शुक्ला यांनी सांगितलं. (Women’s Asia Cup 2026)

(हेही वाचा – वडनगरच्या भूमीतून विकसित भारताचा संकल्प; DCM Eknath Shinde यांच्याकडून पंतप्रधान मोदींच्या सेवायात्रेचा गौरव)

भारतीय महिला संघाची ही भूमिका गेल्या वर्षीच्या पुरुषांच्या आशिया चषकाला मिळती जुळती आहे. त्या वेळीही भारतीय पुरुष संघाने मोहसिन नक्वी यांच्याकडून विजेतेपदाचा करंडक स्वीकारला नव्हता. यंदाच्या घटनेनंतर या विषयावर पुन्हा एकदा क्रिकेटविश्वात चर्चा सुरू झाली असून, त्यावर कपिल देव यांनी मात्र थोडक्यात आणि मिश्कील शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. (Women’s Asia Cup 2026)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.