Davis Cup 2026 : भारताला मोठा धक्का; युकी भांबरी कोरियाविरुद्धच्या डेव्हिस चषक सामन्यातून बाहेर

Davis Cup 2026 : दुखापतीमुळे भांबरीने हा निर्णय घेतला आहे. 

11
युकी भांबरी टेनिस खेळताना, डेव्हिस कप 2026 साठी तयारी करत आहे.
Davis Cup 2026 : भारताला मोठा धक्का; युकी भांबरी कोरियाविरुद्धच्या डेव्हिस चषक सामन्यातून बाहेर
  • ऋजुता लुकतुके

Davis Cup 2026                  दक्षिण कोरियाविरुद्धच्या डेव्हिस कप लढतीपूर्वी भारतीय टेनिस संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अनुभवी दुहेरीतील खेळाडू युकी भांबरी मांडीच्या दुखापतीमुळे या महत्त्वाच्या लढतीत खेळू शकणार नाही. भारताचे कर्णधार रोहित राजपाल यांनी भांबरीच्या अनुपलब्धतेला दुजोरा दिला आहे. (Davis Cup 2026)

भांबरीला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील पहिल्या सामन्यापूर्वी सरावादरम्यान उजव्या मांडीला दुखापत झाली होती. सुरुवातीला ही दुखापत किरकोळ असल्याचे सांगण्यात आले होते आणि त्याच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहभागावर परिणाम होणार नसल्याचेही भांबरीने स्पष्ट केले होते. मात्र, दुखापतीतून अपेक्षित वेगाने सावरणे शक्य न झाल्याने आता त्याला कोरियाविरुद्धच्या डेव्हिस कप सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. (Davis Cup 2026)

(हेही वाचा – UPI मोफत असेलही, पण बँका सामान्य ग्राहकांना १० प्रकारचे शुल्क आकारतात; जाणून घ्या कसे?)

भांबरीच्या अनुपस्थितीचा सर्वाधिक परिणाम भारताच्या दुहेरीच्या नियोजनावर होणार आहे. यापूर्वी त्याची धक्षिणेश्वर सुरेश याच्यासोबत जोडी करण्यात आली होती. नेदरलँड्सविरुद्धच्या मागील डेव्हिस कप लढतीत या जोडीने प्रभावी कामगिरी केली होती. आता कर्णधार रोहित राजपाल यांना अखेरच्या क्षणी नव्या जोडीचा विचार करावा लागणार आहे. (Davis Cup 2026)

भारताकडे पर्याय म्हणून एन. श्रीराम बालाजी, अनिरुद्ध चंद्रशेखर आणि निकी पूनाचा यांची नावे चर्चेत आहेत. बालाजी सध्या दुहेरीत भारताचा क्रमांक दोनचा खेळाडू आहे. अनिरुद्ध चंद्रशेखरला संघाशी जोडण्यासाठी आधीच प्रयत्न सुरू करण्यात आले असून, निकी पूनाचाच्या व्हिसासाठीही प्रक्रिया करण्यात आली आहे. (Davis Cup 2026)

(हेही वाचा – Sunil Gavaskar Appeal to BCCI : भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी सचिन-द्रविड-गांगुलीची गरज? गावसकरांनी बीसीसीआयला दिला मोलाचा सल्ला)

भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील डेव्हिस कप पात्रता फेरीतील दुसऱ्या फेरीची लढत १८ आणि १९ सप्टेंबरला सोलमध्ये होणार आहे. या लढतीतील विजेता अंतिम आठ संघांच्या डेव्हिस कप स्पर्धेत स्थान मिळवेल. त्यामुळे भांबरीची अनुपस्थिती भारताच्या दुहेरीच्या रणनीतीसमोर नवे आव्हान उभे करणारी ठरणार आहे. (Davis Cup 2026)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.