पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानी सैन्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांत पाकिस्तानी सैन्याच्या १४ हून अधिक लष्करी चौक्यांवर ताबा मिळवला असून, त्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) केला आहे. या कारवाईदरम्यान चौक्यांमध्ये असलेला शस्त्रसाठाही बंडखोरांनी लुटला असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
(हेही वाचा Shivsena कोणाची? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी; शिंदेंच्या वकिलांच्या युक्तिवादाने प्रकरणात नवा ट्विस्ट)
आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी बलूच लिबरेशन आर्मीकडून (BLA) एक व्हिडिओ देखील जारी करण्यात आला आहे. या फुटेजमध्ये बलूच लिबरेशन आर्मीचे लढाऊ पाकिस्तानी सैन्याच्या चौक्यांवर ताबा मिळवताना आणि त्या नेस्तनाबूत करताना स्पष्ट दिसत आहेत. ही संपूर्ण कारवाई अत्यंत नियोजित पद्धतीने करण्यात आल्याचे बंडखोर गटाचे म्हणणे आहे. बलूच लिबरेशन आर्मीने (BLA) ज्या भागात या चौक्या उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे, त्यात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ‘क्वेटा-तफ्तान व्यापार मार्ग’ समाविष्ट आहे. हा मार्ग पाकिस्तानसाठी व्यापार आणि लष्करी हालचालींच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्याच्या सुरक्षेवर आणि या भागातील व्यापारी वाहतुकीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Join Our WhatsApp Community


