Kalyan मध्ये मोदक महोत्सवासह पौष्टिक खाद्यपदार्थ स्पर्धेचे आयोजन

रविवारी शारदा विद्या मंदिरात रंगणार चविष्ट सोहळा.

11
Kalyan मध्ये मोदक महोत्सवासह पौष्टिक खाद्यपदार्थ स्पर्धेचे आयोजन
Kalyan मध्ये मोदक महोत्सवासह पौष्टिक खाद्यपदार्थ स्पर्धेचे आयोजन
  • कल्याण : प्रतिनिधी

Kalyan : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) उत्सवी वातावरणात गणेश भक्तांना पारंपरिक खाद्यसंस्कृतीची गोडी आणि आरोग्यदायी आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी कल्याणमध्ये (Kalyan) अनोख्या मोदक महोत्सवाचे (Modak Festival) आणि स्वादिष्ट व पौष्टिक खाद्यपदार्थ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सुभेदारवाडा कट्टा, कल्याण विकास फाऊंडेशन, उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने हा चविष्ट आणि आरोग्यदायी सोहळा रविवारी सायंकाळी ४ ते ६ वाजता पश्चिमेकडे असलेल्या लाल चौकी येथील शारदा विद्या मंदिर शाळेत होणार असून या कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

(हेही वाचा – Police : पोलिसांच्या तत्परतेमुळे फाउंटन ब्रिजवर टळला मोठा अनर्थ; चिमुकल्यांसह चौघांचे प्राण वाचवले)

या महोत्सवांतर्गत दोन वेगवेगळ्या गटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पहिला गट हा मोदक स्पर्धेचा असून यामध्ये उकडीचे, तळलेले किंवा कोणत्याही प्रकारचे मोदक सादर करता येणार आहेत. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी कोणतीही वयोमर्यादा ठेवण्यात आलेली नसून महिला, पुरुष आणि सर्व वयोगटातील नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे. दुसरा गट हा आरोग्यदायी खाद्यपदार्थ स्पर्धेचा असणार आहे. या स्पर्धेत पालक आणि शालेय विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे सहभाग घ्यायचा असून इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. स्पर्धकांना कोणताही एक स्वादिष्ट आणि त्याचबरोबर पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करून सादर करायचा आहे, जेणेकरून लहान मुलांमध्ये पौष्टिक आहाराबाबत आवड निर्माण होईल.

या उपक्रमात कल्याणकरांनी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी नाव नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी अर्जुन पाटील 9082449843, संजय पांडे 9819288680, वैशाली पाटील 8652273939, वर्षा पाटील 8850389180, रो. रमेश खाचणे 9892923391 किंवा मानसी वैद्य 9271876555 यांच्याशी संपर्क साधावा.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.