Mumbai-Pune Expressway : फॉर्च्युनरने अचानक ब्रेक दाबला अन् 5 वाहनांचा…भीषण अपघाताचा CCTV व्हिडिओ व्हायरल

133
Mumbai-Pune Expressway Accident
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरील भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Mumbai-Pune Expressway :  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या ‘मिसिंग लिंक’ (Mumbai Pune Missing Link) मार्गावर, शुक्रवारी (7 ऑगस्ट) पहाटे सुमारे 1.20 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एका फॉर्च्युनर कारने अचानक ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या वाहनांना ब्रेक लावण्यास वेळ मिळाला नाही आणि काही क्षणांतच पाच वाहनांची साखळी धडक झाली. या संपूर्ण अपघाताचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेमका अपघात कसा घडला?

प्राथमिक माहितीनुसार, पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर फॉर्च्युनर एसयूव्ही अचानक मंदावली आणि चालकाने ब्रेक लावला. त्यामागून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांना अंतर कमी असल्याने वेळेत नियंत्रण मिळवता आले नाही. परिणामी मागून येणारी वाहने एकामागोमाग एक फॉर्च्युनरवर आदळली आणि काही सेकंदांतच साखळी अपघात झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये वाहनांची जोरदार धडक आणि त्यानंतर उडालेला गोंधळ स्पष्टपणे दिसत आहे. (Mumbai-Pune Expressway Accident)

अपघातानंतर काही क्षणांतच मागून येणारा मालवाहू टेम्पोही नियंत्रण गमावून समोरील वाहनांवर जाऊन आदळला. त्यामुळे अपघाताची तीव्रता आणखी वाढली. धडकेमुळे अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही वाहनांच्या पुढील आणि मागील भागाचा चक्काचूर झाला. (Mumbai-Pune Expressway Accident)

हेही वाचा: Raj Thackeray : “भेटायचंच नव्हतं तर बोलावलं कशाला?”; सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचा राज ठाकरेंवर संताप, नेमकं काय घडलं?

(व्हिडिओ सौजन्य: Preeti Sompura)

सुदैवाने जीवितहानी टळली

अपघात भीषण असला तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही जणांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. (Mumbai-Pune Expressway Accident)

या अपघातामुळे काही काळ पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक मंदावली. अपघातग्रस्त वाहने हटवल्यानंतर टप्प्याटप्प्याने वाहतूक पूर्ववत करण्यात आली. महामार्गावरील इतर वाहनचालकांनाही काही काळ रांगेत थांबावे लागले.

दरम्यान, व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये फॉर्च्युनरने अचानक ब्रेक लावल्यानंतर मागील वाहनांना प्रतिक्रिया देण्यासाठी फारच कमी वेळ मिळाल्याचे दिसते. त्यामुळे काही सेकंदांतच एकामागून एक वाहने धडकली आणि मोठा अपघात घडला. या घटनेनंतर महामार्गावरील सुरक्षित अंतर राखण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. (Mumbai-Pune Expressway Accident)

हेही वाचा: इलॉन मस्क यांच्या SpaceX रॉकेटची चंद्रावर जोरदार धडक; धुळीचा प्रचंड लोट, व्हिडिओ व्हायरल

‘मिसिंग लिंक’ पुन्हा चर्चेत

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ कमी झाला असला, तरी या मार्गावरील हा मोठा अपघात असल्याने सुरक्षिततेबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. याआधी काही आठवड्यांपूर्वी मिसिंग लिंकवरील खड्ड्यांचे आणि बोगद्याजवळ दरड कोसळल्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते, ज्यामुळे हा मार्ग चर्चेत आला होता. तज्ज्ञांच्या मते, बोगदे आणि उंच पुलांच्या या मार्गावर वाहनांमध्ये पुरेसे अंतर राखणे, वेगमर्यादेचे पालन करणे आणि अचानक ब्रेक टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (Mumbai-Pune Expressway Accident)

हेही पाहा:

 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.