Raj Thackeray : “भेटायचंच नव्हतं तर बोलावलं कशाला?”; सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचा राज ठाकरेंवर संताप, नेमकं काय घडलं?

नाशिक दौऱ्यातील राज ठाकरेंची नियोजित भेट ऐनवेळी रद्द; प्रतीक्षा लांबल्याने सुवर्णपदक विजेता खेळाडू दिलीप गावत आणि त्यांचे प्रशिक्षकांची नाराजी

119
Raj Thackeray Nashik
Raj Thackeray faces backlash from athlete Dilip Gavit.

Raj Thackeray : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान घडलेल्या एका घटनेची सध्या राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात चर्चा रंगली आहे. सुवर्णपदक विजेते धावपटू दिलीप गवित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे हे राज ठाकरे यांची नियोजित भेट घेण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना सुमारे अडीच तास प्रतीक्षा करावी लागल्याचा दावा करण्यात आला असून, त्यानंतर त्यांनी भेट न घेताच तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. (Raj Thackeray Nashik)

मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप गवित (Dilip Gavit) आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, नियोजित वेळ उलटल्यानंतरही भेट होत नसल्याने दोघांनाही बराच वेळ थांबावे लागले. प्रतीक्षा वाढत गेल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि अखेर भेट न घेण्याचाच निर्णय घेतला.

हेही वाचा: Horoscope 7 August 2026 : शुक्रवार ‘या’ राशींसाठी घेऊन आलाय नोकरी, करिअरबाबत मोठे संकेत: वाचा आजचे राशीभविष्य

प्रशिक्षकांची नाराजी, मनसे पदाधिकाऱ्यांची मनधरणी 

माध्यमांशी संवाद साधताना प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “राज ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत, याबाबत कोणतीही शंका नाही. मात्र, आम्हीही देश आणि महाराष्ट्रासाठी योगदान दिले आहे. भारताचा तिरंगा उंचावणाऱ्या खेळाडूला इतका वेळ प्रतीक्षा करायला लावणे योग्य नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत या प्रकाराबद्दल खंत आणि संताप व्यक्त केला. (Raj Thackeray Nashik) 

दिलीप गवित आणि त्यांचे प्रशिक्षक भेट न घेता निघून गेल्यानंतर मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचेही वृत्त आहे. मात्र, ते आपल्या निर्णयावर ठाम राहत तेथून रवाना झाले.

दिलीप गवित हे महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू असून त्यांनी विविध स्पर्धांमध्ये भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या यशामुळे त्यांना राज्यातील अनेक मान्यवरांकडून सत्कारही करण्यात आला आहे. (Raj Thackeray Nashik)

हेही वाचा: 8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार? जाणून घ्या ताजे अपडेट्स

राजकीय नेत्यांच्या भेटीसाठी खेळाडूंना प्रतीक्षा करावी लागल्याचा दावा समोर आल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः सुवर्णपदक विजेत्या खेळाडूने नाराज होऊन भेटच रद्द केल्याच्या वृत्तामुळे सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दरम्यान, या प्रकरणावर मनसेकडून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. आज (शुक्रवार) देखील राज ठाकरे नाशिकमध्येच मुक्कामी असून, पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर ते ११ वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Raj Thackeray Nashik) 

हेही पाहा:

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.