इलॉन मस्क यांच्या SpaceX रॉकेटची चंद्रावर जोरदार धडक; धुळीचा प्रचंड लोट, व्हिडिओ व्हायरल

रॉकेटची धडक बसताच चंद्राच्या पृष्ठभागावरून मोठ्या प्रमाणात धूळ हवेत उडाल्याचे दुर्बिणींच्या मदतीने पाहायला मिळाले

121
Elon Musk SpaceX moon
इलॉन मस्क यांच्या रॉकेटची चंद्रावर जोरदार धडक

Elon Musk SpaceX Rocket : स्पेसएक्सच्या फाल्कन-9 (Falcon 9) रॉकेटच्या दुसऱ्या टप्प्याचा (Second Stage) एक भाग चंद्रावर आदळल्याची घटना समोर आली आहे. या धडकेमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात धूळ उडाली आणि एक नवीन खड्डा (Crater) तयार झाला. या घटनेचा व्हिडिओ स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क (Elon Musk) यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याची जगभरात चर्चा सुरू झाली आहे.

जानेवारी 2025 मध्ये स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटद्वारे फायरफ्लाय एअरोस्पेस कंपनीचा चंद्र मोहिमेसाठीचा लँडर अवकाशात पाठवण्यात आला होता. या मोहिमेचे काम पूर्ण झाल्यानंतर रॉकेटचा सुमारे चार टन वजनाचा दुसरा टप्पा अवकाशातच फिरत राहिला. पुढे त्याचा मार्ग बदलत गेला आणि अखेर बुधवारी पहाटे, हा भाग चंद्रावरील आइन्स्टाइन विवराजवळ ताशी सुमारे 5,400 मैल (सुमारे 8,690 किमी) वेगाने जाऊन धडकला. (Elon Musk SpaceX Rocket)

हेही वाचा: PM Modi : शिंदेसेनेत गेलेल्या ‘6’ बंडखोर खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत ‘ब्रेकफास्ट बैठक’; कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?

धडकेनंतर काय घडलं?

रॉकेटची धडक बसताच चंद्राच्या पृष्ठभागावरून मोठ्या प्रमाणात धूळ हवेत उडाल्याचे दुर्बिणींच्या मदतीने पाहायला मिळाले. सुरुवातीला एक क्षणभर तेजस्वी प्रकाशझोत दिसला आणि त्यानंतर धुळीचा मोठा ढग परिसरात पसरल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. या धडकेमुळे चंद्रावर नव्याने एक विवर तयार झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा खड्डा 20 ते 40 मीटर रुंद आणि सुमारे 5 मीटर खोल असू शकतो.

या रॉकेटच्या अवशेषाचा मार्ग खगोलशास्त्रज्ञ गेल्या काही महिन्यांपासून अभ्यासत होते. त्यावेळीच हा अवशेष चंद्रावर आदळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. त्यामुळे जगभरातील अनेक वेधशाळांनी आणि संशोधन संस्थांनी ही घटना टिपण्यासाठी विशेष तयारी केली होती. अपेक्षेप्रमाणे धडकेनंतर दिसलेला प्रकाशझोत आणि धुळीचा लोटही दुर्बिणींमध्ये स्पष्टपणे नोंदवण्यात आला. (Elon Musk SpaceX Rocket)

इलॉन मस्क यांनी शेअर केला व्हिडिओ

स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांनी या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र, या घटनेच्या नावाखाली सोशल मीडियावर फिरणारे सर्वच व्हिडिओ खरे नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वैज्ञानिक संस्थांनी प्रसिद्ध केलेले अधिकृत व्हिडिओ आणि वेधशाळांनी नोंदवलेली दृश्येच विश्वसनीय मानली जात आहेत. (Elon Musk SpaceX Rocket)

हेही वाचा: Raj Thackeray : “भेटायचंच नव्हतं तर बोलावलं कशाला?”; सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचा राज ठाकरेंवर संताप, नेमकं काय घडलं?

चंद्रावर उल्कापिंड आदळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र, मानवनिर्मित रॉकेटची चंद्रावर झालेली धडक त्या तुलनेने दुर्मीळ मानली जात आहे. अशाप्रकारच्या धडकेमुळे चंद्राच्या पृष्ठभागावर नेमके काय बदल होतात, विवर कशा प्रकारे तयार होते आणि धूळ किती अंतरापर्यंत पसरते, याचा अभ्यास करण्याची शास्त्रज्ञांना महत्त्वाची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. तज्ज्ञांच्या मते, भविष्यातील चंद्र मोहिमा अधिक सुरक्षित आणि प्रभावी करण्यासाठी तसेच अंतराळातील वाढत्या अवशेषांचे (Space Debris) व्यवस्थापन करण्यासाठीही या निरीक्षणांचा उपयोग होईल.

हेही पाहा:

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.