PM Modi Meet : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झालेले 6 खासदारांची, शुक्रवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नवी दिल्लीत ‘ब्रेकफास्ट बैठक’ होणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
लोकसभा सचिवालयाने अलीकडेच या सहा बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला मान्यता दिली, त्यानंतर प्रथमच हे खासदार पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानी विशेष न्याहारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. (PM Modi Meet)
उपलब्ध माहितीनुसार, या बैठकीत केंद्र सरकारच्या विविध योजना, मतदारसंघांतील विकासकामे तसेच आगामी संसदीय कामकाजाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांच्यासह इतर खासदारही आपल्या मतदारसंघांतील विकासकामे, केंद्र सरकारच्या योजना आणि प्रलंबित प्रकल्पांबाबत पंतप्रधान मोदींसमोर भूमिका मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (PM Modi Meet)
कोण आहेत हे सहा खासदार?
उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झालेल्या खासदारांमध्ये पुढील नावांचा समावेश आहे. (PM Modi Meet)
- ओमप्रकाश राजेनिंबाळकर (धाराशिव)
- संजय जाधव (परभणी)
- संजय देशमुख (यवतमाळ)
- संजय दिना पाटील (मुंबई ईशान्य)
- नागेश पाटील-आष्टीकर (हिंगोली)
- भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)
हेही वाचा: National Gymnastics Competition साठी अमरावतीचे १२ खेळाडू महाराष्ट्र संघात
विलीनीकरणानंतरची पहिली मोठी बैठक
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या सहा खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला अलीकडेच अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयानंतर लोकसभेतील शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या खासदारांची संख्या १३ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींसोबत होणाऱ्या बैठकीकडे राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात आहे. (PM Modi Meet)
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
आगामी संसदीय कामकाज, मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) विधेयक आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवरही या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (PM Modi Meet)
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community

