Tarun Tejpal दोषी; बलात्कार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, ट्रायल कोर्टाचा निकाल रद्द

99
Tarun Tejpal
Tarun Tejpal

 

‘तहलका’ मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल (Tarun Tejpal) यांना लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने २०१३ मधील बलात्कार प्रकरणात त्यांना दोषी ठरवत गोवा सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये दिलेला निर्दोष मुक्ततेचा निकाल रद्द केला. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तेजपालला १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली असून, ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. (Tarun Tejpal convicted in 2013 case)

सुनावणीवेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या तेजपालने दोन मुलींचे वडील असल्याचा दावा करत दयेची याचना केली होती. तर गोवा सरकारतर्फे हजर असलेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी “नाही म्हणजे नाही” असा संदेश देण्यासाठी कमाल शिक्षेची मागणी केली होती. हे प्रकरण गोवा सरकारने गोवा सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित होते. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठाने या प्रकरणाचा निकाल देत तेजपाल यांना दोषी ठरवले.(Tarun Tejpal convicted in 2013 case)

काय आहे प्रकरण?

२०१३ मध्ये ‘तहलका’ मासिकाच्या एका कार्यक्रमादरम्यान गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचा आरोप आहे. तेजपाल यांच्या कनिष्ठ महिला सहकाऱ्याने लिफ्टमध्ये त्यांच्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात गोवा सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये पुराव्याअभावी तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, त्या निर्णयाला गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत तरुण तेजपाल यांना दोषी ठरवले आहे.(Tarun Tejpal convicted in 2013 case)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.