“इराणवर इतिहासातील सर्वात मोठा हल्ला करणार होतो, पण…”; Donald Trump यांचा मोठा दावा! अखेरच्या क्षणी काय घडलं?

"इराणवर इतिहासातील सर्वात मोठा हल्ला करणार होतो, पण..."; Donald Trump यांचा मोठा दावा! अखेरच्या क्षणी काय घडलं?

84
America: परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर नवे निर्बंध, नियम मोडल्यास विद्यापीठांची मान्यता रद्द होण्याची शक्यता; भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम होईल का?
America: परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर नवे निर्बंध, नियम मोडल्यास विद्यापीठांची मान्यता रद्द होण्याची शक्यता; भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम होईल का?

इराणवर दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात मोठा हल्ला करण्याची तयारी केली होती, पण हल्ला करण्याऐवजी अखेरच्या क्षणी त्यांच्याशी चर्चा केली, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी बुधवारी केला. लास वेगासमधील एका कार्यक्रमात बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) म्हणाले की, अमेरिकेने लष्करी कारवाईच्या माध्यमातून इराणला कमकुवत केले आहे. त्यानंतर आता इराण वाटाघाटी करण्यासाठी तयार झाला आहे.(Donald Trump on Iran Attack Statement)

(हेही वाचा : Walmik Karad ला तुरुंगात VIP ट्रिटमेंट, धनंजय देशमुखांचं पत्र; Supriya Sule यांची पोस्ट चर्चेत)

लास वेगासमधील कार्यक्रमात बोलत असताना ट्रम्प (Donald Trump) म्हणाले की, अमेरिकेने सर्वात मोठा हल्ला करण्याचे नियोजन केले होते. मात्र हल्ल्याच्या काही वेळापूर्वी इराणी अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. “इराणी अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितले की, कृपया असे करू नका. आपण चर्चा करूया”, असे विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. अमेरिकेने सातत्याने निर्माण केलेल्या लष्करी दबावामुळे हे शक्य झाले, असेही ट्रम्प (Donald Trump)म्हणाले.(Donald Trump on Iran Attack Statement)

(हेही वाचा : Sheikh Hasina यांच्या पत्रकार परिषदेनंतर बांगलादेशात खळबळ! माजी कर्णधाराच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला)

इराणबरोबर राजनैतिक चर्चा करण्यास अमेरिका तयार असली तरी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत अमेरिकेची भूमिका बदललेली नसल्याचे ट्रम्प (Donald Trump)यांनी स्पष्ट केले. “मला लोकांना मारायचे नाही. त्यामुळे मी युद्धाऐवजी कराराला प्राधान्य देईन. मात्र, इराण अण्वस्त्रसज्ज होऊ शकत नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे अमेरिका-इराण संबंधांबाबत नव्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.(Donald Trump on Iran Attack Statement)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.