प्रतिनिधी
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने(BJP)राज्यभर व्यापक जनसंपर्क आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यासाठी मोठी मोहीम आखली आहे. ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येणार असून, या माध्यमातून युवक-युवतींसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्याची तयारी पक्षाने सुरू केली आहे.(BJP)
या अभियानात केवळ भाजपचे पदाधिकारीच नव्हे, तर विविध सामाजिक संस्था, मित्र पक्ष आणि समविचारी संघटनांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. राज्यभर एकाचवेळी राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी विविध ठिकाणी रॅली, जनजागृती आणि देशभक्तीपर उपक्रम राबविण्याचा पक्षाचा मानस आहे.(BJP)
(हेही वाचा – Mumbai Crime : दुहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली! मोठ्या आवाजात गाणी वाजवल्याच्या वादातून बाप-लेकाची हत्या )
विशेषतः मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथे हजारो युवक-युवतींनी या तिरंगा रॅलीत सहभागी व्हावे, यासाठी पक्षाकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. सोशल मीडियासह स्थानिक पातळीवरही जनसंपर्क वाढवून मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग सुनिश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे.(BJP)
स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला अधिक व्यापक स्वरूप देण्याच्या उद्देशाने आयोजित या रॅलीत भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी सक्रियपणे सहभागी होणार आहेत. राष्ट्रध्वजाचा सन्मान, राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविणे हा या अभियानामागील प्रमुख उद्देश असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.(BJP)
दरम्यान, या राज्यव्यापी तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः हातात तिरंगा घेऊन सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, तसेच पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार आणि इतर प्रमुख पदाधिकारीही विविध जिल्ह्यांतील रॅलीत सहभागी होणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. ९ ते १७ ऑगस्टदरम्यान प्रत्येक जिल्ह्यात या तिरंगा रॅलींचे आयोजन करण्यात येणार आहे.(BJP)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

