प्रतिनिधी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू असतानाच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांचा धुरळा उडाला आहे. न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut)यांनी केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टने राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे!
यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय..या बाबत आमच्या मनात शंका नाही!
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/m2u1htLgKs— Sanjay Raut (@rautsanjay61) August 6, 2026
न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक घडामोडीवर राजकीय पक्ष आणि नेत्यांचे बारकाईने लक्ष आहे. या प्रकरणाचा निकाल भविष्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतो, अशी चर्चा सुरू असतानाच राऊत यांच्या पोस्टने वातावरण अधिकच तापवले आहे.(Sanjay Raut)
(हेही वाचा – Tarun Tejpal दोषी; बलात्कार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, ट्रायल कोर्टाचा निकाल रद्द )
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसांच्या मुक्कामासाठी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे या मूळ गावी रवाना झाले आहेत. हा दौरा पूर्वनियोजित नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू असल्याने या दोन्ही घडामोडींची सांगड घालत अनेक तर्क लावले जात आहेत. मात्र, या दौऱ्याचा न्यायालयीन प्रक्रियेशी कोणताही अधिकृत संबंध असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही.(Sanjay Raut)
राजकीय नेत्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून अनेकदा अप्रत्यक्ष संदेश दिले जात असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे राऊत यांच्या या पोस्टचाही अर्थ विविध पातळ्यांवर लावला जात असून, समर्थक आणि विरोधकांकडून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.(Sanjay Raut)
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी सुरू असतानाच संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत, “कायद्यानेच खेळ आटोपतोय… देशाच्या संविधानावर आमचा विश्वास आहे,” असे सूचक वक्तव्य केले. त्यांच्या या पोस्टनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना वेग आला असून, न्यायालयातील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Sanjay Raut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

