Mumbai Crime : दुहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली! मोठ्या आवाजात गाणी वाजवल्याच्या वादातून बाप-लेकाची हत्या

Mumbai Crime : दुहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली! मोठ्या आवाजात गाणी वाजवल्याच्या वादातून बाप-लेकाची हत्या

143
Mumbai Crime : भांडुपमध्ये गुन्हे शाखेचा छापा; 'पाचवी पास' डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार!
Mumbai Crime : भांडुपमध्ये गुन्हे शाखेचा छापा; 'पाचवी पास' डॉक्टरकडून रुग्णांवर उपचार!

Mumbai Crime : मुंबईतील विक्रोळी पश्चिम येथील राहुल नगर परिसरात अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास मोठ्या आवाजात गाणी वाजवण्यास विरोध केल्यावरून झालेल्या वादातून एका कुटूंबावर चाकुने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बाप-लेकाचा मृत्यू झाला असून कुटुंबातील इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहे, त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या हल्ल्यात जखमी झालेल्या सुनील विश्वकर्मा (वय ४०) आणि त्यांचा १४ वर्षांचा मुलगा श्लोक विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तसेच, सुनील यांच्या पत्नी अंजू विश्वकर्मा आणि लहान मुलगा विवान विश्वकर्मा यांनाही हल्लेखोरांनी चाकूसह लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली असून, ते दोघेही गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत.

(हेही वाचा – Sheikh Hasina यांच्या पत्रकार परिषदेनंतर बांगलादेशात खळबळ! माजी कर्णधाराच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला )

पार्कसाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राहुल नगरमध्ये पूर्वीचा घरगुती वाद आणि मोठ्या आवाजात लावलेल्‍या गाण्यावरून दोन कुटूंबामध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी टोकाचे पाऊल उचलत सुनील विश्वकर्मा यांच्या कुटुंबावर लाथा-बुक्क्यांनी आणि धारदार चाकूने हल्ला केला, या हल्ल्यात एका कुटूंबातील चौघेजण गंभीर जखमी झाले, त्यांना तात्काळ राजवाडी रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी सुनील विश्वकर्मा आणि त्यांचा १४ वर्षाचा मुलगा यांना मृत घोषित केले, तसेच पत्नी अंजु आणि लहान मुलगा विवान यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तत्परता दाखवत सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या घटनास्थळ पूर्णपणे सुरक्षित करण्यात आले असून फॉरेन्सिक (तज्ज्ञ) पथकाकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.