धर्मांतरविरोधी कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी हे Hindu Janjagruti Samiti च्या दोन दशकांच्या संघर्षाला मिळालेले ऐतिहासिक यश

85
धर्मांतरविरोधी कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी हे Hindu Janjagruti Samiti च्या दोन दशकांच्या संघर्षाला मिळालेले ऐतिहासिक यश
धर्मांतरविरोधी कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी हे Hindu Janjagruti Samiti च्या दोन दशकांच्या संघर्षाला मिळालेले ऐतिहासिक यश

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ (Anti-Conversion Law) या ऐतिहासिक विधेयकाला सन्माननीय राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्याबद्दल हिंदू जनजागृती समिती (Hindu Janjagruti Samiti) आणि सर्व समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राज्य सरकारचे (State Govt) मनःपूर्वक अभिनंदन! छुप्या प्रेमातून होणाऱ्या धर्मांतराचे गंभीर संकट ओळखून सन २००६ मध्ये हिंदू जनजागृती समितीने ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) या विषयावर देशातील पहिलेवहिले पुस्तक प्रकाशित करून महाराष्ट्रात या संदर्भातील कायद्याची सर्वात पहिली अधिकृत मागणी लावून धरली होती. पुढे ११ भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले. हा विषय त्या वेळी कोणी बोलत नव्हते तेव्हा हा विषय समितीने आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ आणि ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून या कायद्याची आवश्यकता अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने देशभर रुजवली. त्यानंतर कृतीच्या स्तरावर प्रयत्न सुरू झाले.

(हेही वाचा – Mumbai Crime : माटुंग्यात कंत्राटदारांवर चाकूने प्राणघातक हल्ला, सायन रुग्णालयात उपचार सुरू)

गेल्या दोन दशकांत रक्षाबंधन, गणेशोत्सव व नवरात्र या उत्सवांमधील जनजागृती मोहिमा, शेकडो आमदारांना दिलेली निवेदने आणि मुख्य म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात काढण्यात आलेले प्रचंड हिंदू मोर्चे व आंदोलने यांमुळे या कायद्यासाठी जनभावनेचा अभूतपूर्व उद्रेक निर्माण झाला. सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा हा अखंड संघर्ष आणि जनभावना यांची योग्य दखल घेऊन सरकारने हा कठोर कायदा अमलात आणल्याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतो. आता या कायद्याची राज्यात अत्यंत प्रभावी आणि कठोर अंमलबजावणी व्हावी, हीच आमची अपेक्षा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.