Kidnapping : कल्याणमध्ये खळबळ! आजीसाठी औषध आणायला गेलेल्या मुलीचे अपहरण

77
Kidnapping : कल्याणमध्ये खळबळ! आजीसाठी औषध आणायला गेलेल्या मुलीचे अपहरण
Kidnapping : कल्याणमध्ये खळबळ! आजीसाठी औषध आणायला गेलेल्या मुलीचे अपहरण
  • कल्याण : प्रतिनिधी

कल्याण (Kalyan) पश्चिमेकडे असलेल्या बेतुरकरपाडा परिसरातून आजीसाठी औषध खरेदीसाठी (Medicine purchase) घराबाहेर पडलेल्या १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनीचे अपहरण (Kidnapping) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिच्या वडिलांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ही विद्यार्थीनी मंगळवारी आजीच्या औषधासाठी म्हणून घराबाहेर पडली. मात्र बराच वेळ होऊनही ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी घाबरून नातेवाईक आणि मैत्रिणींकडे चौकशी केली. तरीही तिचा कोणताही मागमूस न लागल्याने अखेर बाजारपेठ पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

(हेही वाचा – Court Establishment : चांदवडसह चार शहरात न्यायालयांची स्थापना)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कल्याण परिसरात अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या टोळीच्या चर्चेने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या घटनेचा तपास सर्व बाजूंनी सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या (Mobile location) आधारे शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून मुलींच्या सुरक्षेबाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.