Uttarakhand Tourism: उत्तराखंड बनतेय आध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र, चारधाम, कैलास धाममध्ये नवे विक्रम

71
Uttarakhand Tourism: उत्तराखंड बनतेय आध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र, चारधाम, कैलास धाममध्ये नवे विक्रम
Uttarakhand Tourism: उत्तराखंड बनतेय आध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र, चारधाम, कैलास धाममध्ये नवे विक्रम

Uttarakhand Tourism: यंदा अनेक प्रसिद्ध मंदिरामध्ये भाविकांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०२६च्या जानेवारी ते जून या ६ महिन्यांत राज्यातील प्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची संख्या विक्रमी वाढल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या अहवालातून समोर आले आहे.

त्यामुळे उत्तराखंड सरकार राज्याला जागतिक दर्जाचे आध्यात्मिक पर्यटन केंद्र् बनवण्यासाठी विविध प्रकल्प राबवत आहे. कुमाऊँ विभागातील प्राचीन मंदिरांच्या विकासासाठी मानसखंड मंदिरमाला मिशन सुरू करण्यात आले असून, रस्ते आणि पर्यटन सुविधांमध्ये झालेल्या सुधारणा याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

हेही वाचा –  अभिनेत्रीविषयी असभ्य टिपण्णी केल्याप्रकरणी Udhayanidhi Stalin यांना अटक 

भाविकांची संख्या वाढली…
यंदा अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

जागेश्वर धाम (अल्मोडा) येथे २०२५ मध्ये ६७,८७५ भाविक आले होते. यंदा ही संख्या वाढून १,७४,११९ वर पोहोचली.

त्रियुगीनारायण मंदिर (रुद्रप्रयाग) येथे भाविकांची संख्या १.३६ लाखांवरून ३,४०,३८५ इतकी झाली.

पूर्णागिरी धाम (चंपावत) येथे जूनअखेर २०,९१,७८८ भाविकांनी दर्शन घेतले.

धारी देवी मंदिर (श्रीनगर) येथे ५,४२,६२६ भाविकांनी भेट दिली.

कैंची धाम (नैनीताल) येथे पहिल्या सहा महिन्यांत २४,३४,५०७ भाविक दाखल झाले. त्यापैकी केवळ जून महिन्यातच ८.६६ लाखांहून अधिक भक्तांनी दर्शन घेतले.

यंदाच्या चारधाम यात्रेलाही अभूतपूर्व प्रतिसाद

  • यात्रेच्या पहिल्या १०५ दिवसांत ४५,८४,३७५ भाविकांनी चारधामचे दर्शन घेतले.
  • यमुनोत्री धाम येथे २ ऑगस्टपर्यंत ६,५४,९५८ भाविकांनी भेट देत आतापर्यंतचा विक्रम नोंदवला.
  • बद्रीनाथ धाम येथे पहिल्या १०० दिवसांत १५,५२,०२१ भाविकांनी दर्शन घेतले, जे गेल्या वर्षापेक्षा सुमारे ३.११ लाखांनी अधिक आहे.

आदी कैलास (पिथोरागढ) येथे २०२६ च्या मे आणि जून या दोन महिन्यांतच ५२,४४१ भाविकांनी दर्शन घेतले. काही वर्षांपूर्वी येथे वर्षभरात दोन हजारांपेक्षाही कमी भाविक येत होते.

‘ह्रषिकेश’ला मोठी पसंती…
धार्मिक स्थळांसोबतच ऋषिकेशजवळील मुनी की रेती, तपोवन आणि शिवपुरी या भागांमध्येही पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत या परिसरात १५,९७,४३९ पर्यटकांनी भेट दिली.
राज्यातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि धार्मिक पर्यटन प्रकल्पांमुळे उत्तराखंडमध्ये देश-विदेशातून भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. यामुळे धार्मिक पर्यटनासोबत स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळत असल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.