अभिनेत्रीविषयी असभ्य टिपण्णी केल्याप्रकरणी Udhayanidhi Stalin यांना अटक 

उदयनीधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) वादग्रस्त विधानामुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वी सत्तेत असतांना त्यांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे विधान केले होते.

110
Udhayanidhi Stalin speaking at an event
Udhayanidhi Stalin addresses the audience.

तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) वादात सापडले आहेत. एका सभेत अभिनेत्री त्रिशाबद्दल कथितरित्या अपमानजनक टिप्पणी केल्याबद्दल त्यांना तीव्र टीकेला सामोरे जावे लागले आहे. या प्रकरणी त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान, तामिळनाडू सरकारचे महाधिवक्ता विजय नारायण यांनी न्यायालयाला माहिती दिली की, तंजावर पोलिसांनी उदयनिधी (Udhayanidhi Stalin)  यांना अटक करून तंजावरला नेले आहे. तथापि, त्यांनी नंतर स्पष्ट केले की पोलिसांनी न्यायालयीन कोठडीची मागणी केली नव्हती आणि त्यांना फक्त त्यांची चौकशी करायची होती. उदयनीधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) वादग्रस्त विधानामुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वी सत्तेत असतांना त्यांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे विधान केले होते.

(हेही वाचा Balochistan Independence Day : बलुचिस्तानने ११ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणून केला जाहीर, जागतिक मान्यतेसाठी आवाहन)

पोलिसांनी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांच्याविरुद्ध सहा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली थेनीमध्ये आंदोलन करणाऱ्या डीएमके कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांच्या अटकेच्या निषेधार्थ डीएमके कार्यकर्त्यांनी थेनीमध्ये आंदोलन केले. पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली, डीएमके कार्यकर्त्यांनी जुन्या थेनी बसस्थानकाजवळ निदर्शने केली. त्यांनी टीव्हीके सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर, रस्ता अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पनीरसेल्वम यांच्यासह अनेक डीएमके कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. उदयनिधी (Udhayanidhi Stalin)  यांच्या कथित जबाबाच्या आधारे तामिळनाडू पोलिसांनी एफआयआर दाखल केला. बीएनएसच्या कलम १९६, १९२, ३५२, ७९, २९६ (बी), ६१ आणि ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.