Ekvira Devi मंदिराच्या जीर्णोद्धाराला आला वेग, दर्शनार्थींसाठी फ्युनिक्युलर रेल्वेची सोय; प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे

92
Ekvira Devi मंदिराच्या जीर्णोद्धाराला आला वेग, दर्शनार्थींसाठी फ्युनिक्युलर रेल्वेची सोय; प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे
Ekvira Devi मंदिराच्या जीर्णोद्धाराला आला वेग, दर्शनार्थींसाठी फ्युनिक्युलर रेल्वेची सोय; प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे

Ekvira Devi राज्यातील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेले लोणावळ्याजवळील कार्ला येथील एकविरा देवी मंदिरात जाणाऱ्या भाविकांसाठी फ्युनिक्युलर रेल्वे उभारली जाणार आहे. बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर या रेल्वेची उभारणी होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) त्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला आहे.

एकविरा देवी मंदिरात विशेषत: चैत्र यात्रा आणि इतर उत्सव काळात येथे मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होते. दरवर्षी या मंदिरात जवळपास ४७ लाख भाविक भेट देतात. सध्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी उंच पायऱ्यांचा मार्ग पार करावा लागतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग भक्तांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मंदिरात भाविकांना सहजरित्या पोहोचता यावे, यासाठी ही सुविधा उभारण्याचे प्रस्तावित आहे. यातून भाविकांना काही मिनिटांत मंदिर परिसरात पोहोचणे शक्य होणार असून त्यांचा वेळही वाचणार आहे. प्रवासही अधिक आरामदायी होईल. दर तासाला १४०० प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे.

हेही वाचा – ITR Filing Deadline : विवरणपत्र भरलं, त्यानंतर चूक लक्षात आली तर काय कराल?

एमएमआरडीसीने काही महिन्यांपूर्वी याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला होता. राज्य सरकारने हा प्रस्ताव तपासणीसाठी आयआयटी मुंबईकडे पाठवण्याची सूचना केली होती. त्यानुसार, सध्या हा प्रस्ताव तपासणीसाठी आयआयटी मुंबईकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मंदिराच्या जीर्णोद्धाराला वेग
– एमएसआरडीसीने एकविरा मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले आहे. मंदिराच्या भिंतीवरील सिमेंट आणि मेटॅलिक पेंटचा थर काढून त्या मूळ स्वरुपात आणल्या जात आहेत.
– नगारखान्याचा संपूर्ण जीर्णोद्धार करून दगडी पायऱ्यांची संरक्षण भिंतीची दुरुस्ती केली जात आहे. यात्रेकरूंसाठी सुविधांची निर्मिती आणि परिसरातील सुशोभीकरणाच्या कामांचाही समावेश आहे.

फ्युनिक्युलर रेल्वे कशी असेल? 
– लांबी ८०० मीटर
– ८९ कोटी रुपये खर्च
– बीओटी सवलत कालावधी ३० वर्ष
– प्रवासी वाहून नेण्याची क्षमता प्रतितास १४०० प्रवासी

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.