Satara DCC Bank Election : एका मतासाठी दोन लाखांची बोली; जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीदरम्यान नेमकं काय घडलं?

Satara DCC Bank Election : एका मतासाठी दोन लाखांची बोली; जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीदरम्यान नेमकं काय घडलं?

127
Satara DCC Bank Election
Satara DCC Bank Election

मतदान प्रक्रिया ही लोकशाहीचा आत्मा मानला जातो. मात्र, त्यासाठीच पैशांची बोली लावल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातून समोर आला आहे. सातारा जिल्ह्याच्या कऱ्हाड तालुक्यातील कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीच्या ठरावादरम्यान चक्क मतदानाचा अधिकार देण्यासाठी दोन लाखांची बोली लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.(Satara DCC Bank Election)

नेमकं काय आहे प्रकरण?

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक येत्या काही दिवसांत पार पडणार आहे. त्यासाठी ५ ऑगस्टपर्यंत विकास सेवा सोसायटी समितीने मतदाराचा ठराव देण्याची मुदत देण्यात आली आहे. हा ठराव देण्यावरुन सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठा गोंधळ सुरु आहे. अनेक ठिकाणी मारामारी आणि वाद झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.  यानंतर आता लोकशाहीला काळिमा फासणारी प्रक्रिया सहकार क्षेत्रात पाहायला मिळाली. ७० हजारापासून सुरु झालेली बोली दोन लाख रुपयांनी मताचा अधिकार खरेदी करुन पार पडली.(Satara DCC Bank Election)

कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीच्या ठरावासंदर्भात आयोजित केली होती. या बैठकीत संस्थेला भरीव आर्थिक मदत करणाऱ्या सभासदाच्या नावे ठराव देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता. यानुसार लिलाव प्रक्रिया राबवून हा ठराव पूर्ण झाला. या लिलावात सभासद आनंदराव जगताप यांनी आपली बोली एक लाख रुपयांनी सुरु केली. बोलीतील रक्कमेची चढाओढ होऊन विक्रमसिंह जगताप यांनी दोन लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावून मताचा अधिकार मिळवला.(Satara DCC Bank Election)

हेही पाहा :
https://youtu.be/6qBCudLo6pU

 

 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.