Maharashtra SDRF : पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून मदतीचा हात; महाराष्ट्राच्या वाट्याला किती निधी?

महाराष्ट्रासाठी जाहीर करण्यात आलेल्या मदत निधीबद्दल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत

99
Maharashtra SDRF
महाराष्ट्रासह सर्व पूरग्रस्त राज्यांना मदत जाहीर

Maharashtra SDRF : देशातील अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने विविध राज्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत एकूण 2,117.85 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर करण्यात आला असून, त्यापैकी महाराष्ट्रासाठी 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

राज्यांना तातडीने मदत पोहोचवण्यावर भर

केंद्र सरकारने स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अतिवृष्टी आणि पूरग्रस्त राज्यांना मदत, बचाव आणि पुनर्वसनासाठी आवश्यक ती सर्व मदत देण्याची भूमिका कायम ठेवली आहे. पूरस्थितीचा सामना करणाऱ्या राज्यांना तातडीने आर्थिक मदत उपलब्ध व्हावी, यासाठी SDRF अंतर्गत आगाऊ निधी मंजूर करण्यात आला आहे. (Maharashtra SDRF)

गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, पूरस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन आणि राज्यांच्या मागण्यांचा विचार करून हा निधी वितरित करण्यात आला आहे.

हेही वाचा: Gold Rate Today : खुशखबर! आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याची घसरण; जाणून घ्या आजचे दर

महाराष्ट्राला 500 कोटींची मदत

यंदाच्या मान्सूनमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला SDRF अंतर्गत 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे आपत्तीग्रस्त भागातील मदतकार्य, बचाव मोहीम आणि पुनर्वसनाची कामे अधिक वेगाने करता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. (Maharashtra SDRF)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानताना, या निधीमुळे आपत्तीग्रस्त कुटुंबांपर्यंत मदत अधिक जलद गतीने पोहोचवणे शक्य होईल, असे म्हटले आहे.

कोणत्या राज्यांना किती निधी?

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार विविध राज्यांना पुढीलप्रमाणे आगाऊ निधी मंजूर करण्यात आला आहे. (Maharashtra SDRF)

  • अरुणाचल प्रदेश – 384.77 कोटी रुपये
  • आसाम – 376.35 कोटी रुपये
  • गुजरात – 500 कोटी रुपये
  • हिमाचल प्रदेश – 293.85 कोटी रुपये (दुसरा हप्ता)
  • महाराष्ट्र – 500 कोटी रुपये
  • ओडिशा – 900 कोटी रुपये (दुसरा हप्ता)

एकूण 2,117.85 कोटी रुपयांचा निधी या राज्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. (Maharashtra SDRF)

गृहमंत्रालयाने सांगितले की, नुकसानीचे प्रत्यक्ष मूल्यांकन करण्यासाठी केंद्रीय पथके अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये भेट देऊन परिस्थितीची पाहणी करून आली आहेत. तसेच, परिस्थितीनुसार इतर राज्यांमध्येही आवश्यक तेथे केंद्रीय पथके पाठविण्यात येणार आहेत.

SDRF म्हणजे नक्की काय?

“State Disaster Response Fund” (SDRF) हा राज्यांना नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणारा निधी आहे. पूर, अतिवृष्टी, भूस्खलन, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बचाव, मदत आणि पुनर्वसनासाठी या निधीचा वापर केला जातो. गरज भासल्यास केंद्र सरकारकडून या निधीचा आगाऊ हप्ताही मंजूर केला जातो. (Maharashtra SDRF)

हेही वाचा: Pune : भररस्त्यात आरोपीची धिंड काढणे पोलिसांना पडले महागात; मानवधिकारातंर्गत मोठा दणका

पूरस्थितीवर केंद्राचे लक्ष

देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, केंद्र सरकार परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त मदत, केंद्रीय पथके आणि आर्थिक सहाय्य देण्याची प्रक्रिया पुढेही सुरू राहील, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

ही मदत पूर आणि अतिवृष्टीमुळे प्रभावित राज्यांमधील बचाव, मदत व पुनर्वसनाची कामे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे राबवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. (Maharashtra SDRF)

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.