KDMC : कल्याण-डोंबिवलीत स्वच्छतेचा ढोल अन् वास्तवात कचरा

107
KDMC : कल्याण-डोंबिवलीत स्वच्छतेचा ढोल अन् वास्तवात कचरा
KDMC : कल्याण-डोंबिवलीत स्वच्छतेचा ढोल अन् वास्तवात कचरा
  • कल्याण : प्रतिनिधी

स्वच्छ कल्याण-डोंबिवली, सुंदर कल्याण-डोंबिवली, असा गाजावाजा करणारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) प्रत्यक्षात मात्र स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाच्या बाबतीत पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शहरांतील चौकांमध्ये उभारण्यात आलेले सुशोभीकरणाचे पुतळे मोडून पडले आहेत, तर काही प्रभाग कार्यालयांसमोरच कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या सगळ्याकडे लोकप्रतिनिधी असो की प्रशासन, दोघेही डोळेझाक करत आहेत.

1004605622

काही वर्षांपूर्वी केडीएमसीने (KDMC) शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली विविध चौकांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून पुतळे उभारले होते. परंतु या पुतळ्यांच्या देखभालीसाठी कोणतीही यंत्रणा किंवा समिती नसल्याने ते पुतळे आज मोडक्या अवस्थेत आहेत.

(हेही वाचा – Indonesia Ferry Fire : प्रवासी बोटीला भीषण आग; ५ जणांचा मृत्यू, तर ४१ प्रवासी अद्याप बेपत्ता)

कल्याण (Kalyan) पूर्वेतील श्रीराम चौक म्हणजेच सूचक नाका येथे आई आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा प्रतिकात्मक पुतळा उभारण्यात आला होता. जोराच्या वाऱ्यामुळे आठवडाभरापूर्वी हा पुतळा कोसळला. मात्र आजतागायत तो पुन्हा उभा करण्यात आलेला नाही. याबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधीने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला नाही.

अशीच परिस्थिती महापालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर आहे. येथील भिंतीवर डोंगर आणि जंगलाचे चित्र रंगवून चार वन्यजीवांचे पुतळे ठेवण्यात आले होते. त्यापैकी आता केवळ हरणाचा एकच पुतळा शिल्लक आहे. बाकीचे पुतळे चोरीला गेले आहेत. याहूनही लाजिरवाणी बाब म्हणजे ड प्रभाग कार्यालयाच्या अगदी समोरील रस्त्यावर कचऱ्याचा (Garbage) मोठा ढीग साचला आहे. स्वच्छतेचा नारा देणारी केडीएमसी जेव्हा स्वतःच्या प्रभाग कार्यालयासमोरील कचरा उचलू शकत नाही, तेव्हा संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचा दावा ती कसा करणार, असा संतप्त सवाल कल्याण-डोंबिवलीकर विचारत आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.