
Central Railway : मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मध्य रेल्वेने ४ ते १४ ऑगस्टदरम्यान सलग ११ दिवसांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे दोन लांब पल्ल्याच्या गाड्यांचा प्रवास ठाणे स्थानकापर्यंतच राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवर लोकमान्य टिळक टर्मिनस येथील विशेष ब्लॉक ४ ऑगस्टला सकाळी ८ वाजल्यापासून ते १४ ऑगस्टला सकाळी ८ वाजेपर्यंत लागू असणार आहे. या कालावधीत शंटिंग नेकचे बांधकाम, सिक सायडिंगमधील बदल, देखभाल सायडिंग यार्डाचे उन्नतीकरण, पिट लाइन्स क्रमांक ६, ७, ८ आणि ९ चा विस्तार, पाणीपुरवठा वाहिन्यांचे काम तसेच ड्रेनेज आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या वाहिन्यांचे वळण बदलण्याची कामे केली जाणार आहेत.
हेही वाचा – Monsoon at Risk : एल निनोचा धोका वाढला? हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा
- ७ ऑगस्ट रोजी सुटणारी गाडी क्रमांक १२१५४ राणी कमलापती-एलटीटी (LTT) एक्सप्रेस.
- ३ ते १३ ऑगस्ट या कालावधीत सुटणारी गाडी क्रमांक १६३४६ तिरुवनंतपुरम-एलटीटी (LTT) नेत्रावती एक्सप्रेस.
दरम्यान, मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे की, पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि सुरक्षिततेशी संबंधित सुधारणांसाठी हे ट्रॅफिक ब्लॉक्स आवश्यक आहेत. प्रवाशांना या बदलांची नोंद घेण्याचे आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही पहा –

