भारत-चीनमधला ऐतिहासिक ‘सिल्क रूट’ पुन्हा खुला; सहा वर्षांनंतर Nathu La Pass मार्गे सीमाव्यापार सुरू

भारत-चीनमधला ऐतिहासिक 'सिल्क रूट' पुन्हा खुला; सहा वर्षांनंतर Nathu La Pass मार्गे सीमाव्यापार सुरू

77
India-China Nathu La Pass Trade
India-China Nathu La Pass Trade

भारत आणि चीन यांच्यातील सिक्कीममधील ऐतिहासिक नाथू ला (Nathu La) मार्गावरील भारत आणि चीनमधील सीमावर्ती व्यापार ६ वर्षांनंतर पुन्हा सुरू झाला आहे. दोन्ही देशांमधील संबंधांच्या दृष्टीने हा एक अत्यंत सकारात्मक संकेत मानला जात आहे. (India-China Nathu La Pass Trade)

दोन्ही देशांदरम्यान ठरलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार (SOP) दरवर्षी मे ते नोव्हेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत व्यापार सुरू राहणार आहे. सोमवार ते गुरुवार या चार दिवसांत व्यापार होईल. प्रत्येक नोंदणीकृत व्यापाऱ्याला दररोज २ लाख रुपयांपर्यंत व्यापार करण्याची मुभा असणार आहे. आयात-निर्यातीचे विद्यमान नियम पूर्वीप्रमाणेच कायम असणार आहे. यापूर्वीप्रमाणेच दोन्ही देशांनी मान्य केलेल्या ३६ वस्तूंच्या यादीतील वस्तूंचीच देवाणघेवाण केली जाणार आहे. (India-China Nathu La Pass Trade)

१९६२ च्या युद्धानंतर मार्ग बंद

१९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर तब्बल ४४ वर्षे हा मार्ग बंद होता. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या चीन दौऱ्यानंतर दोन्ही देशांमध्ये एक करार झाला आणि ६ जुलै २००६ रोजी नाथू ला खिंडीतून व्यापार पुन्हा सुरू झाला. कोरोना महामारीमुळे २०२० पासून सहा वर्षे हा मार्ग व्यापारासाठी बंद करण्यात आला होता. (India-China Nathu La Pass Trade)

आता, काही आठवड्यांपूर्वीच नाथू ला मार्गे कैलास मानसरोवर यात्रेलाही पुन्हा परवानगी मिळाल्यानंतर सीमाव्यापार सुरू होत असल्याने भारत आणि चीनमधील सीमापार देवाणघेवाण पूर्वपदावर येण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेल्याचे मानले जात आहे. (India-China Nathu La Pass Trade)

हेही पाहा :

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.