Pandharpur : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेसाठी ऑनलाइन नोंदणी पुन्हा सुरू होणार; कुठे आणि कसे कराल बुकिंग?

मंदिर समितीकडून या पूजांसाठी टप्प्याटप्प्याने ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे

126
Pandharpur Temple online pooja
पंढरपूर मंदिरातील पूजा आणि नैवेद्याचे ऑनलाईन बुकिंग सुरू

Pandharpur :  श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी पूजा करण्याची इच्छा असलेल्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा आणि महानैवेद्य सहभाग योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीकडून या पूजांसाठी टप्प्याटप्प्याने ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

यापूर्वीच्या टप्प्यांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पुढील कालावधीसाठी नोंदणी खुली करण्यात येत आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे देश-विदेशातील भाविकांनाही प्रत्यक्ष पंढरपुरात येण्यापूर्वी पूजा आरक्षित करण्याची सुविधा मिळणार आहे. सोमवार,  3 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून, ही नोंदणी सुरू होणार असून भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून घरबसल्या पूजेचे बुकिंग करता येणार आहे. (Pandharpur Temple online pooja)

हेही वाचा: Maharashtra Rain Alert : येत्या आठवड्यात तुमच्या भागात पाऊस कोसळणार की उकाडा वाढणार? हवामान विभागाचा मोठा अंदाज

कोणत्या पूजांसाठी होणार नोंदणी?

3 ऑगस्टपासून भाविकांना पुढील धार्मिक सेवांसाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.

  • श्री विठ्ठलाची नित्यपूजा
  • श्री रुक्मिणीमातेची नित्यपूजा
  • पाद्यपूजा
  • तुळशी अर्चन पूजा
  • महानैवेद्य सहभाग योजना

या सर्व पूजांचे बुकिंग मंदिर समितीच्या अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. (Pandharpur Temple online pooja)

ऑनलाईन पूजेच्या बुकिंगसाठी लिंक: https://vitthalrukminimandir.org/

पूजांसाठी देणगी किती?

मंदिर समितीने विविध पूजांसाठी निश्चित देणगी मूल्य ठेवले आहे.

  • श्री विठ्ठलाची नित्यपूजा – 25,000 रुपये
  • श्री रुक्मिणीमातेची नित्यपूजा – 11,000 रुपये
  • पाद्यपूजा – 5,000 रुपये
  • तुळशी अर्चन पूजा – 2,100 रुपये
  • महानैवेद्य सहभाग योजना – 7,000 रुपये (Pandharpur Temple online pooja)

हेही वाचा: Commonwealth Games 2026 मध्ये भारताची सुवर्णगर्जना; एका दिवसात 16 पदके, बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण, एकूण 39 पदके

ऑनलाइन नोंदणी करताना काय खबरदारी घ्याल?

मंदिर समितीने भाविकांना केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच पूजेचे बुकिंग करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा एजंटमार्फत नोंदणी करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाइन नोंदणीदरम्यान अडचण आल्यास मंदिर समितीच्या कार्यालयातूनही आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. (Pandharpur Temple online pooja)

ऑनलाइन नोंदणी व्यवस्थेमुळे राज्यासह देशभरातील आणि परदेशातील विठ्ठलभक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. श्रावण महिन्यात आणि इतर धार्मिक कालावधीत मोठी गर्दी होत असल्याने आगाऊ नोंदणी करून भाविकांना नियोजनबद्ध पद्धतीने पूजेत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे मंदिरातील व्यवस्थापन अधिक सुलभ होण्यासही मदत होणार असल्याचे मंदिर समितीने सांगितले आहे. (Pandharpur Temple online pooja)

हेही वाचा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.