अमेरिकेच्या हवाई (US Air Force) ताकदीला एक मोठा धक्का बसला असून, दक्षिण कॅलिफोर्नियामधील सॅन डिएगो येथील मिरामार हवाई तळाजवळ (Air Base) नौदलाचे एक अत्याधुनिक आणि महागडे लढाऊ विमान कोसळले आहे. या भीषण अपघाताच्या वेळी विमानातील वैमानिकाने अत्यंत प्रसंगावधान राखून समयीच स्वतःला विमानातून बाहेर झोकून दिले. त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले असून तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत विमानाचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे साम्राज्य पसरले होते. (F-35B)
(हेही वाचा – “टिळकांच्या नजरेतून भगवद्गीता वाचा, तुम्ही आयुष्यात…”; केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचा तरुणांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?)
अतिशय गंभीर श्रेणीतील अपघाताची नोंद
अमेरिकन मरीन कॉर्प्सने या संदर्भात अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले असून, या घटनेचे वर्गीकरण अतिशय गंभीर अपघातांच्या श्रेणीत केले आहे. अमेरिकन लष्कराच्या नियमांनुसार, जेव्हा एखाद्या दुर्घटनेत वीस लाख अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आर्थिक नुकसान होते, एखादे लष्करी विमान पूर्णपणे नष्ट होते किंवा एखाद्या सैनिकाचा मृत्यू होतो, तेव्हा त्याला या सर्वोच्च गंभीर श्रेणीत गणले जाते. या विमानाची किंमत सुमारे १०९ दशलक्ष डॉलर्स इतकी प्रचंड असल्याने प्रशासनाने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आणि विमानाची वैशिष्ट्ये
विमान कोसळल्यानंतर बाजूच्या मैदानातील झाडीझुडपांना भीषण आग लागली, ज्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाने पांढऱ्या रासायनिक द्रव्यांचा आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. हे विमान अत्यंत आधुनिक अशा छुप्या (स्टील्थ) तंत्रज्ञानाने सुसज्ज होते. या विशिष्ट प्रकारच्या विमानाची सर्वात मोठी खासियत म्हणजे, यासाठी कोणत्याही लांब धावपट्टीची (Runway) आवश्यकता नसते; हे विमान अत्यंत छोट्या जागेवरून उड्डाण करू शकते आणि हेलिकॉप्टरप्रमाणे थेट जमिनीवर उतरण्यास सक्षम असते. या तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधण्याचे काम सध्या सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

