PM Modi Viral Video : “शिवीगाळ करणाऱ्यांना मला माफ करायचंय, या भरकटलेल्या तरुणांना…” आंदोलनातील गैरप्रकारांबद्दल काय म्हणाले पंतप्रधान, भावनिक व्हिडिओ व्हायरल

"तरुणांच्या गैरवर्ताबाबत राग व्यक्त करण्याऐवजी, या भरकटलेल्या तरुणांना समजून घेऊन, योग्य दिशा दाखवणे अधिक महत्त्वाचे आहे," असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले

126
PM Modi Viral Video
CJP आंदोलनातील तरुणांच्या गैरवर्तनाबद्दल, त्यांना समज देणारा PM मोदींचा व्हिडिओ व्हायरल (सौजन्य- X)

PM Modi Viral Video : दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईंबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्याच्या वादानंतर पंतप्रधान मोदींनी प्रथमच यावर प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ संदेशात त्यांनी संबंधित आंदोलनकर्त्या तरुणांना शिक्षा करण्याऐवजी त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच, “मला त्यांना माफ करायचं आहे. शिवीगाळ करून कोणत्याही समस्येचे समाधान होत नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी व्हिडिओमध्ये म्हणाले की, “समाजात पेपरफुटीच्या घटनेबाबत मोठा आक्रोश असल्याची जाणीव मला आहे. मात्र, राग व्यक्त करण्यासाठी आपल्या देशातील मुली अशा प्रकारची गलिच्छ भाषा वापरू शकतात, हा एक प्रकारचा सांस्कृतिक धक्का आहे. तरीही, अशाप्रसंगी रागवण्यापेक्षा या तरुणांना समजून घेऊन, त्यांना योग्य दिशा दाखवणे अधिक महत्त्वाचे आहे असे मला वाटते.” (PM Modi Viral Video)

हेही वाचा: Kulgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम हल्ल्याची पुनरावृत्ती? दोन हिंदू स्थलांतरित मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, एकाचा मृत्यू

‘या’ वयात चुका होतातच, गरज आहे चुका सुधारण्याची…

पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले की, लहान वयात चुका होतात आणि त्या चुकांमधून शिकण्याची संधीही मिळते. हीच खरी तरुणाईची ओळख आहे. त्यामुळे अशा भरकटलेल्या मुलांना दूर लोटण्याऐवजी त्यांना जवळ घेऊन देशहिताचा मार्ग दाखवणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. (PM Modi Viral Video)

मोदी यांनी पुढे असेही सांगितले की, देश घडवण्याची ताकद तरुणांमध्ये आहे. त्यामुळे द्वेष, शिवीगाळ किंवा वैयक्तिक टीका यामध्ये ऊर्जा वाया घालवण्याऐवजी शिक्षण, नवकल्पना आणि राष्ट्रनिर्मितीत योगदान देण्यावर भर द्यावा. तरुणांनी आपली स्वप्ने पूर्ण करत विकसित भारताच्या निर्मितीत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. (PM Modi Viral Video)

हेही वाचा: India Weather Alert : सावधान! देशभरात मान्सूनचा रौद्रावतार; ‘या’ राज्यांत पूर आणि ढगफुटीचा इशारा

दरम्यान, जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला मोठे राजकीय स्वरूप आले होते. त्यानंतर संबंधित तरुणीविरोधात तक्रार दाखल झाली, तर तिने नंतर सार्वजनिकरित्या माफीही मागितली. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा समेटाचा संदेश चर्चेचा विषय ठरत आहे. (PM Modi Viral Video)

हेही पाहा: 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.