महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? अहिल्याबाईंच्या पुतळ्यासमोर महिलांना नाचवण्यावरून MNS ची टीका

राजू पाटील यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल

61
राजू पाटील भाषण देताना, कल्याणमध्ये
महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? अहिल्याबाईंच्या पुतळ्यासमोर महिलांना नाचवण्यावरून MNS ची टीका
  • कल्याण, प्रतिनिधी

MNS           मनसेचे नेते तथा कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी राज्यातील राजकीय आणि सांस्कृतिक स्थितीवरून सरकारला लक्ष्य केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर महिलांना नाचवण्याच्या प्रकारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभत नसल्याचे म्हटले आहे. (MNS)

(हेही वाचा – सुरक्षित कल्याण-डोंबिवलीसाठी KDMC व पोलिसांचे संयुक्त पाऊल; सीसीटीव्ही नेटवर्क होणार हायटेक)

राजू पाटील यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून पोस्ट करताना म्हटले की, महाराष्ट्रात नेमकं काय सुरू आहे ? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या महान आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या पुतळ्यासमोर महिलांना नाचवले जात आहे. अशा प्रकारचे राजकारण आपण यापूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पाहिले आहे. महिलांना नाचवून लोकांना गोळा करणे किंवा त्याकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहणे, ही महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती. आपण महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचा पायंडा पाडत आहोत का ? असा सवाल उपस्थित करत राजू पाटील यांनी याच विषयावर काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाष्य केल्याची आठवून करून दिली. राज ठाकरे यांनीही अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर आक्षेप घेतला होता. (MNS)

(हेही वाचा – Odisha Medical Pepar Leak: पुन्हा पेपरफूटी! ओडिशामध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वी डॉक्टरकीची प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांवर प्रसारित)

महाराष्ट्राची ओळखच बदलण्याचा धोका

राजू पाटील यांच्या या पोस्टनंतर समाज माध्यमांवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी त्यांच्या मताशी सहमती दर्शवत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी, अशी मागणी केली आहे. तर काहींनी राजकीय स्टंट असल्याचे म्हणत टीकाही केली आहे. राजकारणात संस्कृती, इतिहास आणि आदर्श यांचा सन्मान राखणे आवश्यक आहे. अन्यथा महाराष्ट्राची ओळखच बदलण्याचा धोका आहे, असा सूचक इशाराही राजू पाटील यांनी या पोस्टमधून दिला आहे. (MNS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.