Mumbai Crime : सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर व्यापाऱ्याने घेतला टोकाचा निर्णय!

103
व्यापारी भावेश मजेठिया यांचा फोटो
Mumbai Crime : सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर व्यापाऱ्याने घेतला टोकाचा निर्णय!
  • प्रतिनिधी 

Mumbai Crime              ठाण्यातील ५१ वर्षीय व्यापाऱ्याने मुंबईत येऊन प्रथम सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले, त्यानंतर टॅक्सीने सी-लिंक गाठून समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. आर्थिक विवंचनेतून व्यापाऱ्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. (Mumbai Crime)

भावेश मजेठिया (५१) असे या व्यापाऱ्यांचे नाव आहे. भावेश हे ठाण्यातील श्रीनगर येथे कुटूंबासह राहण्यास होते. कपड्याचे व्यापारी असलेले भावेश यांचे कपडयाचे दुकान आहे. मागील ६ महिन्यांपासून व्यापाऱ्यात होणाऱ्या नुकसानीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या भावेश यांनी टोकाचे पाऊल उचलत शुक्रवारी सकाळी घर सोडले. भावेशने ट्रेनने घाटकोपर गाठले, दुकानावर गेल्यानंतर काही वेळाने ते पुन्हा ट्रेनने दादर येथे आले. तेथून प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरात येऊन देवाचे दर्शन घेऊन मंदिरा बाहेरून टॅक्सी पकडून सी-लिंक गाठले. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Kalyan-Ulhasnagar च्या वेशीवरील गैरधंद्यांवर टांच; चिंचपाड्यातील बेकायदा जीन्स कारखाना उद्ध्वस्त)

भावेश यांनी टॅक्सी चालकाकडे आपल्याला उलट्या होत असल्याचे सांगून गाडी थांबवण्यास सांगितले. चालक गाडी थांबवताच भावेश यांनी त्वरित खाली उतरून पुलावरून थेट समुद्रात उडी घेतली. घटनेची माहिती मिळताच वरळी पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदतकार्यासाठी सागरी पोलिसांची मदत घेतली. मात्र, आज समुद्रात मोठी भरती आणि लाटांचे उधाण असल्याने स्थानिक मच्छीमारांनी बोटी समुद्रात उतरवण्यास नकार दिला. पोलिसांनी सागरी पोलिसांच्या ‘बोट क्रमांक ३’ची मदत मागितली, परंतु लाटांचा जोर इतका प्रचंड होता की बोटमध्ये पाणी शिरू लागल्याने ती पुन्हा येलो गेटकडे परतली. अखेर वरळी पोलिसांच्या विनंतीनंतर वरळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आपल्या रबरी लाईफ सेव्हिंग बोटच्या सहाय्याने धाडसी मोहीम राबवत दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मृतदेह शोधून बाहेर काढला. (Mumbai Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत भावेश मजेठिया हे ठाण्यातील श्रीनगर भागात राहत होते आणि त्यांचे घाटकोपर येथे कापडाचे दुकान होते. गेल्या सहा महिन्यांपासून व्यवसायात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्यामुळे ते मानसिक तणावात होते, असे त्यांचा मुलगा प्रथम मजेठिया यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक यादव करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.