Kalyan-Ulhasnagar च्या वेशीवरील गैरधंद्यांवर टांच; चिंचपाड्यातील बेकायदा जीन्स कारखाना उद्ध्वस्त

कारखानदाराचे कोट्यवधींचे नुकसान

86
Demolished illegal jeans factory in Kalyan-Ulhasnagar
Kalyan-Ulhasnagar च्या वेशीवरील गैरधंद्यांवर टांच; चिंचपाड्यातील बेकायदा जीन्स कारखाना उद्ध्वस्त
  • कल्याण, प्रतिनिधी

Kalyan-Ulhasnagar                कल्याण आणि उल्हासनगरच्या सीमेवरील चिंचपाडा भागात बेकायदा थाटलेला प्रदूषणकारी जीन्स कारखाना केडीएमसीच्या आय प्रभाग पथकाने गुरूवारी जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करून टाकला. स्थानिक जमीन मालकाच्या संगनमताने उल्हासनगरातील काही उद्योजकांनी केडीएमसीकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता हा कारखाना चालविला जात होता. प्रचंड दुर्गंधी आणि जलप्रदूषणाच्या तक्रारी येताच केडीएमसीच्या पथकाने या बेकायदा कारखान्यावर थेट कारवाईचा दणका दिला. (Kalyan-Ulhasnagar)

हा कारखाना रात्रीच्या वेळी रंगीत रसायनयुक्त पाणी थेट गटारात आणि मोकळ्या जागेत सोडत होता. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून पाणी दूषित होत असे. काही स्थानिक दादा-भाई या कारखान्याला पाठीशी घालत होते. सध्या चालू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात वालधुनी नदी प्रदूषणावरून आमदारांनी जीन्स कारखान्यांकडे बोट दाखवले होते. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे. (Kalyan-Ulhasnagar)

वीस वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने उल्हासनगरातील बेकायदा जीन्स कारखाने हटविण्यात आले होते. आता तेच कारखाने कल्याण-उल्हासनगरच्या वेशीवरील ग्रामीण भागात चोरून लपून सुरू झाले आहेत. सुरूवातीला निवारा (शेड) बांधून छोटा व्यवसाय असल्याचा देखावा निर्माण केला जातो. भाडे मिळत असल्याने जमीन मालकही प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून कारखान्याला पाठबळ देतात. ही माहिती आय प्रभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील लोखंडे आणि अतिक्रमण तथा अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांना मिळाली होती. (Kalyan-Ulhasnagar)

(हेही वाचा – ‘महात्मा फुले वाड्या’तील वटपूजनावर लादलेली बंदी मागे; Hindu Janajagruti Samiti सह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या लढ्याला मोठे यश)

कारवाईमुळे कारखानदारांत घबराट

अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी सहकाऱ्यांसह पाहणी केली असता कारखान्यातील रसायनयुक्त पाणी थेट बाहेर सोडल्याचे आढळले. गुरूवारी सकाळीच पथकाने धडक देत कारखाना मालकाला यंत्र काढण्याची संधीही दिली नाही. जेसीबीने कारखान्याची इमारत आणि आतील संपूर्ण यंत्रणा नष्ट केली. या कारवाईत मालकाचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले. अचानक झालेल्या कारवाईने आशेळे, माणेरे, आदी भागातील इतर जीन्स कारखानदारांमध्ये घबराट पसरली आहे. (Kalyan-Ulhasnagar)

दादा-भाईंना हुसकावले

कारवाई सुरू होताच काही स्थानिक दादा-भाई नोटीस न देता कारवाई कशी करता? असा सवाल करत अडथळा आणू लागले. तेव्हा अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी अडथळा आणाल तर थेट फौजदारी गुन्हे दाखल करू, अशी तंबी दिली. सुरक्षा पथकाने या दादा-भाईंना तेथून हुसकावून लावले. पुन्हा कारखाना उभारल्यास जमीन मालक आणि कारखानदारावर फौजदारी कारवाई होईल, असा इशारा अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांनी दिला. (Kalyan-Ulhasnagar)

(हेही वाचा – Indian Economy: जागतिक संकटातही भारताची घोडदौड कायम! ‘जगाच्या अर्थव्यवस्थेचा चालक’ म्हणत IMFने केलं कौतुक)

उर्वरित कारखानेही लवकरच भुईसपाट

चार-पाच वर्षांपूर्वी तत्कालीन सहाय्यक आयुक्त भारत पवार आणि हेमा मुंबरकर यांनी चिंचपाडा, आशेळे, माणेरे भागातील शंभरहून अधिक जीन्स कारखाने जमीनदोस्त केले होते. आता पुन्हा त्याच भागात हे लोण पसरत आहे. या संदर्भात अधीक्षक राजेंद्र साळुंखे म्हणाले, आय प्रभागात रस्ते अडवणारे फेरीवाले हटवले. धोकादायक जाहिरात फलक काढले. प्रदूषण करणारा जीन्स कारखाना उद्ध्वस्त केला. आता उर्वरित कारखानेही लवकरच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जमीनदोस्त करू, असाही इशारा त्यांनी दिला. (Kalyan-Ulhasnagar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.