ठाकरे गटाला मोठा धक्का: Operation Tiger फत्ते, ६ खासदारांच्या बंडाने राजकीय भूकंप!

ठाकरे गटाला मोठा धक्का: Operation Tiger फत्ते, ६ खासदारांच्या बंडाने राजकीय भूकंप!

94
ठाकरे गटात पुन्हा ‘Operation Tiger’ ची चर्चा; १४ आमदार शिंदेंच्या वाटेवर?
ठाकरे गटात पुन्हा ‘Operation Tiger’ ची चर्चा; १४ आमदार शिंदेंच्या वाटेवर?
प्रतिनिधी

​शिवसेनेच्या गोटातून आज एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘ऑपरेशन टायगर'(Operation Tiger)यशस्वी झाले असून, उद्धव ठाकरे यांच्या गटातील ६ खासदारांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा हादरा बसला असून, राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.(Operation Tiger)

​या बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे आपली अधिकृत संमती पत्रे सुपूर्द केली आहेत. लवकरच या सहाही खासदारांचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ प्रसारित होणार असून, त्यानंतर अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या घडामोडींमुळे एनडीए (NDA) मधील शिवसेनेच्या लोकसभा खासदारांची संख्या आता थेट १३ वर पोहोचली आहे. या सर्व राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत, ज्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Operation Tiger)

(हेही वाचा – पाकिस्तानची भारताला थेट युद्धाची धमकी! Indus Water Treaty वरून संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ बरळले )

​उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही या गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर, मतदारसंघातील विकासकामांसाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, या बंडामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी रणनीती असल्याचे बोलले जात आहे.(Operation Tiger)

​’ऑपरेशन टायगर’च्या या पूर्ण प्रक्रियेत गेल्या दहा दिवसांपासून मोठ्या हालचाली घडत होत्या. १० जूनपासून सुरू झालेली ही रणनीती, १४ जूनला ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीतील अनुपस्थिती आणि त्यानंतर दिल्लीत झालेली गुप्त खलबते यांतून हे बंड शिजेपर्यंत ठाकरे गटाला याची पुसटशीही कल्पना आली नव्हती. १६ जूनला हे खासदार दिल्लीला रवाना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या राजकीय भूकंपाला सुरुवात झाली. आता या सहा खासदारांच्या अधिकृत फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.(Operation Tiger)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.