Mumbai Taxi Auto : रिक्षा-टॅक्सी चालकांनो लक्ष द्या! १५ ऑगस्टपूर्वी ‘हा’ कोर्स करणे बंधनकारक, अन्यथा…

104
MMR: रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, नवीन दरानुसार किमान भाडे किती वाढले? जाणून घ्या...
MMR: रिक्षा-टॅक्सी प्रवास १ सप्टेंबरपासून महागणार, नवीन दरानुसार किमान भाडे किती वाढले? जाणून घ्या...
  • ​विशेष प्रतिनिधी

​मुंबईसह (Mumbai) राज्यभरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. प्रवाशांशी संवाद साधणे अधिक सुलभ आणि दर्जेदार व्हावे, या उद्देशाने आता अमराठी चालकांसाठी मराठी भाषेचे प्राथमिक ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत अमराठी चालकांना १ जून ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत चार तासांचा विशेष ‘मराठी भाषा संवाद पाठ्यक्रम’ पूर्ण करणे बंधनकारक आहे. (Mumbai Taxi Auto)

(हेही वाचा – Dombivli मध्ये संतप्त महिलांचा केडीएमसीच्या कार्यालयावर हंडा-कळशी मोर्चा)

​या प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थांना अधिकृत जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या संस्थांच्या माध्यमातून चालकांना विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यांच्याकडून मिळणारे प्रमाणपत्रच परिवहन विभागाकडून (Transport Department) वैध मानले जाईल. मुंबई महानगर प्रदेशात (MMR) यासाठी तब्बल ७१ अभ्यास केंद्रे उभारण्यात आली असून, साडेचार हजार शिक्षकांमार्फत चालकांना प्रशिक्षित केले जात आहे.

​परिवहन विभागाचे सहआयुक्त रवी गायकवाड (Ravi Gaikwad) यांनी स्पष्ट केले आहे की, १५ ऑगस्ट २०२६ नंतर ज्या चालकांकडे या प्रशिक्षणाचे अधिकृत प्रमाणपत्र नसेल, त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल. या निर्णयाचा मूळ उद्देश केवळ भाषेची अडचण दूर करून सेवा अधिक सक्षम करणे हा आहे. त्यामुळे कोणत्याही कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यापेक्षा, सर्व अमराठी चालकांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेऊन लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळवून घ्यावे, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. (Mumbai Taxi Auto)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.