Monsoon : पाऊस रुसला, गोठ्यातील ‘जीव’ कासावीस; बळीराजासमोर चारापाण्याचा नवा पेच

Monsoon : पाऊस रुसला, गोठ्यातील 'जीव' कासावीस; बळीराजासमोर चारापाण्याचा नवा पेच

87
Monsoon : पाऊस रुसला, गोठ्यातील 'जीव' कासावीस; बळीराजासमोर चारापाण्याचा नवा पेच
Monsoon : पाऊस रुसला, गोठ्यातील 'जीव' कासावीस; बळीराजासमोर चारापाण्याचा नवा पेच
प्रतिनिधी

​जूनचा पंधरवडा उलटूनही पावसाचा पत्ता नसल्याने संपूर्ण राज्य होरपळत आहे. या लांबलेल्या मान्सूनने(Monsoon)केवळ शेतीचीच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या पशुधनाची मोठी कोंडी केली आहे. शेतातील हिरवीगार कुरणे आता जळून खाक झाली असून, जनावरांच्या पोटाचा प्रश्न गंभीर बनला आहे.(Monsoon)

(हेही वाचा – FIFA World Cup 2026 : स्वित्झर्लंडने बोस्नियाला ४-१ ने हरवले )

​पावसाअभावी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता शून्यावर आली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना नाईलाजास्तव जनावरांना सुका आणि निकस चारा द्यावा लागत आहे. सकस आहाराच्या अभावामुळे दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, दुग्धोत्पादनात मोठी घट नोंदवली जात आहे. चाऱ्याचे वाढते दर आणि दुधाचे मिळणारे अत्यल्प भाव या दुहेरी संकटात सापडलेला दुग्ध उत्पादक शेतकरी सध्या हवालदिल झाला आहे.(Monsoon)

​पाऊस असाच लांबणीवर पडल्यास चाऱ्याची टंचाई अधिक गडद होऊन पशुधनावर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती व्यक्त होत आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी वर्गासमोर आता अस्तित्वाची लढाई उभी राहिली आहे.(Monsoon)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.