Operation Tiger : पंधरा कोटींचा ‘अॅडव्हान्स’ आणि दिल्लीत हालचाली; ठाकरे गटाच्या खासदारांनी केलेल्या बंडाने राजकारण ढवळले!

Operation Tiger : पंधरा कोटींचा 'अॅडव्हान्स' आणि दिल्लीत हालचाली; ठाकरे गटाच्या खासदारांनी केलेल्या बंडाने राजकारण ढवळले!

112
Operation Tiger : पंधरा कोटींचा 'अॅडव्हान्स' आणि दिल्लीत हालचाली; ठाकरे गटाच्या खासदारांनी केलेल्या बंडाने राजकारण ढवळले!
Operation Tiger : पंधरा कोटींचा 'अॅडव्हान्स' आणि दिल्लीत हालचाली; ठाकरे गटाच्या खासदारांनी केलेल्या बंडाने राजकारण ढवळले!
प्रतिनिधी

​महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका धक्कादायक दाव्याने खळबळ उडवून दिली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक खळबळजनक आरोप केला आहे. “अपना सपना मनी… मनी! महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी १५ कोटींचा अॅडव्हान्स दिला जात आहे,” असे राऊत यांनी ट्विट करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. या गंभीर आरोपानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.(Operation Tiger)

​एकीकडे राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगली असताना, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही प्रमुख खासदार तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. यात प्रामुख्याने संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील यांचा समावेश असल्याचे समजते. याच वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत पोहोचल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.(Operation Tiger)

(हेही वाचा – India’s Asian Games 2026 : आशियाई खेळांसाठी भारताचा टेनिस संघ जाहीर; सुमित आणि सहजाकडे नेतृत्व )

​सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील नऊपैकी सहा खासदार बंडाच्या पवित्र्यात असून ते आपला वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, येत्या १९ जून रोजी शिवसेनेचा स्थापनादिन आहे. त्यापूर्वीच हे बंड घडवून आणले जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. हे बंडखोर खासदार आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन स्वतंत्र गटाची अधिकृत नोंदणी करण्याची शक्यता आहे. यानंतर हा गट एनडीएसोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.(Operation Tiger)

​गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या कार्यशैलीवर काही खासदारांची असलेली नाराजी उघड झाली होती, त्याचेच रूपांतर आता या मोठ्या राजकीय भूकंपामध्ये होत असल्याचे चित्र आहे. आता हे बंडखोर खासदार नेमकी कोणती भूमिका घेतात आणि उद्धव ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Operation Tiger)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.